बाणावली आमदारांकडून सुसंवादाऐवजी गुंडगिरीला प्रोत्साहन
मडगाव : बाणावली मतदारसंघातील आमदारांना वार्का आणि फात्राडेच्या लोकांनी उघडे पाडले असून वार्कामध्ये जे घडत आहे ती लोकशाही नाही, ते दिवसाढवळ्या गुंडाराज आहे. प्रामाणिक, कष्टाळू गोमंतकीयांना फक्त त्यांच्या पायावर उभे राहिल्याबद्दल धमकावले जात आहे, त्यांच्यावर हल्ला केला जात आहे आणि दहशत निर्माण केली जात आहे. जेव्हा एक निवडून आलेला प्रतिनिधी, स्वयंघोषित ‘सोशल मीडिया आमदार’ व्हेंझी व्हिएगस हे सुसंवादाऐवजी गुंडगिरीला प्रोत्साहन देऊ लागतात तेव्हा ते नेतृत्व नसते, असे वॉरन आलेमाव यांनी म्हटले आहे.
आम्ही वार्का ग्रामपंचायत आणि फात्राडेच्या धाडसी रहिवाशांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत, असे माजी सरपंच आणि विद्यमान पंच रोलँड फर्नांडिस यांनी सांगितले. हा लोकांचा विश्वासघात आहे आणि गोव्याच्या आत्म्यावर हल्ला आहे, असे आलेमाव यांनी म्हटले आहे. आमदारांकडून सहकार्य न मिळाल्याने वॉरन आलेमाव यांचे सहकार्य घेतले. वाळूच्या टेकड्या आहे तशाच आहेत. येथे वाढलेली हिरवळ हटविण्यात आल्याचे येथील एका महिलेने सांगितले. मच्छीमारांना जाळी घेऊन जाण्यास अडथळे निर्माण होत होते. ही पारंपरिक वाट असून झाडेझुडपे वाढल्याने ती हटविण्यात आली आहेत, असे यावेळी सांगण्यात आले आणि ‘आप’च्या काहींनी लाथाडल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
पंचसदस्यावर हल्ला म्हणजे गावातील लोकांवर हल्ला
पंच रोलँड हे 15 वर्षे पंच आहेत. त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्यावर हात उगारणे म्हणजे गावातील सर्वांवर हात उगारणे असा अर्थ होतो. आम्ही असे प्रकार खपवून घेणार नाहीत ‘आप’चे स्थानिक आमदार घटनास्थळी येऊन लोकांकडून माहिती जाणून घेण्याऐवजी वातानुकूलित खोलीत बसून पत्रकार परिषद घेतात, अशी टीका आलेमाव यांनी केली.