For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाणावली जि.पं.पोटनिवडणुकीचा‘आप’च्या पिमेंतांकडून जोरदार प्रचार

12:59 PM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
बाणावली जि पं पोटनिवडणुकीचा‘आप’च्या पिमेंतांकडून जोरदार प्रचार
Advertisement

मडगाव : इंडी आघाडीच्या पाठिंब्यावर बाणावलीतील जिल्हा पंचायत पोटनिवडणूक लढविणारे आपचे उमेदवार जोसेफ पिमेंता यांनी जोरदार प्रचार चालविला आहे. आमदार व्हेंझी व्हिएगस यांच्यासोबत करमणे आणि ओडली पंचायतक्षेत्रात रविवारी त्यांनी घरोघरी भेट देऊन प्रचार केला. मतदारांनी विरोधकांच्या एकतेला, इंडी आघाडीला म्हणजे झाडूला मत द्यावे, असे आवाहन उमेदवार पिमेंता करताना आढळून आले. बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी पाच उमेदवारांचे अर्ज ग्राह्य ठरले होते. त्यापैकी प्रदीप वेर्लेकर (अपक्ष) यांनी माघार घेतल्यामुळे आता फ्रँक फर्नांडिस (अपक्ष), ग्राफान्स फर्नांडिस (अपक्ष), जोसेफ पिमेंता (आप) आणि रॉयला फर्नांडिस (अपक्ष) यांच्यात लढत होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.