‘कामसूत्र - ख्रिसमस उत्सव कथा’ कार्यक्रमावर बंदी
विविध संस्थांकडून तक्रारी दाखल : पोलिसांनी दखल घेऊन केली कारवाई
पणजी : गोव्यात ‘कामसूत्र आणि ख्रिसमस उत्सव कथा’ या चार दिवसांच्या कार्यक्रमाच्या प्रचारात्मक जाहिरातीवर जोरदार टीका झाली आणि रविवारी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. हा कार्यक्रम 25 ते 28 डिसेंबर दरम्यान होणार होता, परंतु स्थानिक गटांनी हा विषय अयोग्य असल्याचे सांगत तीव्र आक्षेप घेतला. गोव्यातील विविध स्वयंसेवी संस्थांनी या कार्यक्रमाबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. कार्यक्रमाचे एक पोस्टर ऑनलाईन फिरत असल्याने पोलिसांनी सार्वजनिकरित्या प्रतिसाद दिला.आपल्या पोस्टमध्ये, गोवा पोलिसांनी जाहीर केले की त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि आयोजकांना कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच कार्यक्रमाशी जोडलेल्या सर्व ऑनलाईन जाहिराती त्वरित काढून टाकण्यास सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलिस स्थानिकांना त्यांच्या भागातील आगामी कार्यक्रमांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत जेणेकरून असे वाद टाळता येणे शक्य आहे. भगवान श्री रजनीश फाऊंडेशनच्या नावाने या कार्यक्रमाचा प्रचार केला जात होता. पोस्टरमध्ये स्थळाचा उल्लेख नव्हता पण सूत्रसंचालकाचे नाव स्वामी ध्यान सुमित असे होते, जे ओशो लुधियाना मेडिटेशन सोसायटीशी संबंधित आहेत.
एआरझेड (अर्ज) या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अऊण पांडे यांनी गुन्हे शाखेकडे औपचारिक तक्रार दाखल केल्यानंतर वादाला वेग आला. ध्यान आणि अध्यात्माच्या नावाखाली गोव्याला अनुचित कार्यमक्रमांचे ठिकाण म्हणून चित्रित केल्याबद्दल त्यांनी या कार्यक्रमावर टीका केली. गोव्याला सेक्स डेस्टिनेशन म्हणून जाहिरात केली जात आहे हे खरोखर दुर्दैवी आहे. जाहिरातदार आणि आयोजकांवर कठोर कारवाई केली जाईल अशी आशा आहे, असे पांडे यांनी सोशल मिडियावर लिहिले आहे.