चहा पिण्याच्या कागदी ग्लासवर बंदी
परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
दोन वर्ष जेलची हवा आणि एक लाख रुपयांचा दंड
परभणी
कॅन्सर सारख्या आजारांना कारणीभूत ठरल असलेल्या चहाच्या कागदी कपावर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बंदी घालण्याचे आदेश दिलेले आहेत. यासंदर्भात परभणी जिल्हाध्यक्ष सय्यद रफिक पेडगावकर यांनी एक निवेदन (२४ डिसेंबर २०२४) रोजी सादर केले होते. परभणी जिल्ह्यात चहाच्या कागदी कपांचा उपयोग अधिक प्रमाणात केला जातो. चहाचे कागदी कप बनवताना त्यामध्ये बीपीए नामक केमिकलचा वापर केला जातो. अशा कागदी कपात गरम चहा घातल्यानंतर त्यातील मायक्रे प्लास्टीकचे कण वितळले जातात. आणि हे प्लास्टीकचे कण पोटात जातात. यामुळे कॅन्सर सारखा आजार उद्भवू शकतो, असे या निवेदना लिहीले होते. हे निवेदन परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना सादर केल्यानंतर त्यांनी या कपवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय या कपचा वापर करताना सापडल्यास, दोन वर्षांसाठी तुरुंगवास आणि एक लाख रुपयांचा दंड करण्यात येईल असेही सांगितले आहे.