बंबरगा-कुपटगिरी बेळगाव ‘हिंद केसरी’चे मानकरी
बेळगाव : अनगोळ येथे श्रीरामसेना हिंदुस्थान आयोजित भव्य निमंत्रितांच्या बैलजोडी शर्यतीत लहान गटात गणपती बाप्पा मोरया-बंबरगा व मोठ्या गटात भावकेश्वरी प्रसन्न-कुपटगिरी या बैलजोडींनी बेळगाव हिंद केसरी हे मानाचे किताब पटकाविले.
अनगोळ येथील तलावात घेण्यात आलेल्या श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ यांच्या वतीने आयोजित बेळगाव हिंदकेसरी किताबाची शर्यतीत तीन दिवस घेण्यात आलेल्या स्पर्धेत लहान गटात 1.गणपती बाप्पा मोरया (बंबरगा) 34.65, 2.नागनाथ प्रसन्न (बेकीनकेरी) 34.69, 3.श्री पडीबसवेश्वर प्रसन्न (हिरेबागेवाडी एम के हुबळी ) 35.66, 4.श्री होळी कामण्णा प्रसन्न (केदनुर ) 36.33, 5.बसवेश्वर प्रसन्न (कबलापूर बहादरवाडी) 37.14, 6.श्री रामदेव प्रसन्न (हळ्ळीगीरी) 37.16, 7.श्री करियम्मादेवी प्रसन्न (मुरगोड होसुर) 37.37, 8.लक्ष्मीदेवी प्रसन्न (भेंडीगिरी) 37.48, 9.मारुती तांबाळकर ( सुळये दाटे )37.59, 10.श्री ग्रामदेवता प्रसन्न (चुंचनाळ) 38.29, 11.श्रीराम सेना हिंदुस्तान (देसूर) 38.52, 12.जय हनुमान प्रसन्न (एम के हुबळी केदनुर) 38.56, 13.श्री दुर्गादेवी प्रसन्न (हुंचीकट्टी) 38.56, 14.करियम्मा देवी प्रसन्न (सुळेभावी ब. कुडची) 39.34, 15.श्री उळवी चन्नबसवेश्वर प्रसन्न एम के हुबळी 39.72 यांनी विजेतेपद पटकाविले. या गटात 31 बक्षीसे देण्यात आली.
बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज श्रीगुरू पुंडलिक महाराज देहूकर, श्रीराम सेना हिंदुस्थान, व समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, चंद्रकांत कोंडूस्कर, उमेश कुऱ्याळकर, श्रीकांत कुऱ्याळकर, बळवंत शिंदोळकर, कृष्णा बैलुर, राहूल परमोजी, विजय घसारी, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, श्रीकांत कदम, दत्ता जाधव, मोतेश बारंदेशकर, प्रशांत जाधव, अनिकेत भोसले आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या बैलजोडी मालकांना बक्षीसे देण्यात आली.
प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ
बैलगाडा शर्यतीमध्ये उपस्थित प्रेक्षकांच्यासाठी ठेवण्यात आलेल्या खास बक्षिसांची सोडत याठिकाणी लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून करण्यात आले. यावेळी विजेत्यांना इलेक्ट्रिक दुचाकी, फ्रिज, मिक्सर, वाशिंग मशिन, किचन सेट, डायनिंग सेट, पंखा, इस्त्राr,व दहा चांदीची नाणी विजेत्या प्रक्षेकांना देण्यात आली.