मारकडवाडीत प्रशासकीय दबावानंतर बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया थांबवली
सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या मतदारसंघातील मारकडवाडीमध्ये निवडणूक संदर्भात अनेक नाट्यमय घडामोडी सुरु आहेत. या गावातील गावकऱ्यांनी ईव्हीएम मशीनवर अविश्वास दर्शवत बॅलेट पेपर वर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. ग्रामस्थांनी पुन्हा निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. या संदर्भातील परवानगीची मागणीही ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली होती. प्रशासनाने परवानगी नाकारली होती. तरीही ग्रामस्थांनी बॅलेट पेपर वर मतदान घेण्याची प्रक्रियेची तयारी आज सकाळपासूनच सुरु केली होती.
दरम्यान जिल्हा प्रशासनाने तातडीने गावात मोठी पोलीस फौज दाखल केली. गावात जमावबंदी लागू केली. आणि बॅलेट पेपर वरील मतदान प्रक्रियेला स्थगिती दिली. गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला विरोध केला. तर प्रशासनाने गावकऱ्यांना असे बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया थांबवली नाही तर प्रत्येकावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सांगितले. पोलिसांनी ग्रामस्थांना थांबवण्यासाठी बळाचा वापर केला. त्यानंतर गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान न घेण्याचा निर्णय घेतला आणि प्रक्रिया थांबवली.
नुकत्या पार पडलेल्या विधानसभेच्या निकालानंतर मारकडवाडीत नाराजी पसरलेली होती. या मतदारसंघातून मविआचे उत्तमराव जानकर हे निवडून आले तर महायुतीचे राम सातपुते यांचा पराभव झाला. या निर्णयावर नाराज दाखवत, मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारा पुनः निवडणूक घेण्यचा निर्णय घेतला.