बालिका आदर्शचे थ्रो बॉलमध्ये यश
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते बेळगाव यांच्यावतीने जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत बालिका आदर्श विद्यालयाने यश संपादन केले आहे. गोमटेश विद्यापीठ येथे या स्पर्धा झाल्या. प्राथमिक गटात बालिका आदर्शने उपांत्य सामन्यात बैलहोंगल तालुक्याला 9-15 व 11-15 अशा फरकाने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना गोमटेश स्कूल मच्छे सोबत झाला. यामध्ये त्याना 11-15, 12-15 अशा फरकाने पराभव केला. हा संघ बागलकोट विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या संघात गोमटेश विद्यालय, हिंदवाडी या शाळेचे 3 तर बालिका आदर्श विद्यालयाचे 9 खेळाडू होते. ऋतुजा जाधव, श्रेया खन्नूकर, श्रावणी पाटील, संचिता पाटील, रिया शेलार, सिद्धी गडकरी, आदिती पलेद, संभावी चिक्कमठ, प्रिया चिक्कमठ, श्रावणी लोहार, आरोही कुलकर्णी, श्रेया आसोगेकर या सर्व खेळाडूंचा संघात समावेश होता. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविले. शाळेचे चेअरमन आनंद गाडगीळ, मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी व मंजुनाथ गोल्लीहळी यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक उमेश बेळगुंदकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.