For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बालिका आदर्शच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात

11:09 AM Dec 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
बालिका आदर्शच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात
Advertisement

बेळगाव : बेळगाव येथील बालिका आदर्श विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात झाल्या.स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी, प्रा .आनंद गाडगीळ, जेष्ठ संचालिका लता कित्तूर, प्रमुख पाहुणे नगरसेविका माधवी सारंग व प्रमूख वक्त्या अपूर्वा खानोलकर यांचे खेळाडूंनी स्वागत केले. सत्कारमूर्ती अपूर्वा नाईक, वैभवी बुद्रुक व वैष्णवी राऊळ (निपाणी) या राष्ट्रीय खेळाडूंचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. प्राप्ती मुचंडीकरने विद्यार्थीनींचे पथसंचलन करून क्रीडा ज्योतीचे अनावरण केले. यात शाळेच्या राष्ट्रीय खेळाडू शिवानी शेलार, श्र्रद्धा कणबरकर, प्रतिज्ञा मोहिते, समीक्षा कर्तस्कर यांनी क्रीडाज्योत पाहुण्यांच्या हाती सुपूर्द केली. पाहुण्या माधवी सारंग यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. लता कित्तूर यांनी पथसंचलनाचा निकाल जाहीर केला. त्यात क्रांतीने प्रथम, शांती गटाने दुसरा क्रमांक पटकावला. वैष्णवी नावगेकर क्रीडापटूंना शपथ देवविली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्र्रम क्रीडाशिक्षक उमेश बेळगुंदकर यांनी घेतले तर त्यांना स्टाफचे सहकार्य लाभले.

Advertisement

Advertisement
Tags :

.