बालिका आदर्श कबड्डी स्पर्धेत उपविजेता
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते बागलकोट यांच्या वतीने चिमडा येथे झालेल्या बेळगाव विभागीयस्तरीय कबड्डी स्पर्धेत जमखंडी माध्यमिक गटात बालिका आदर्श विद्यालयाने उपांत्य सामन्यात शिरशी संघाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात बागलकोट संघाने बालिका आदर्शचा 19-10 असा पराभव केल्याने बालिका आदर्श उपविजेता ठरला. बालिका आदर्श संघातील दिया मोहिते,श्रद्धा पाटील,मनस्वी बिर्जे, यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून ते बेळगांव जिह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत ही राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा बेंगळूर येथे 9 ते 11 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या संघात गव्हर्नमेंट सरदार विद्यालयाची खेळाडू लक्ष्मी राठोड व बालिका आदर्श विद्यालाचे 6 खेळाडू श्रावणी पाटील ,श्रद्धा पाटील ,मनस्वी बिर्जे ,दिया मोहिते, अंजली कटगालवकर ,स्नेहा बैलूर, यांचा या संघात समावेश आहे. या संघाला शाळेचे चेअरमन आनंद गाडगीळ , मुख्याध्यापक एन. ओ .डोणकरी व मंजुनाथ गोल्लीहळी मारुती घाडी यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक उमेश बेळगुंदकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे