महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बालिका आदर्शला सर्वसाधारण विजेतेपद

10:15 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व एसकेई कन्नड माध्यम स्कूल आयोजित छ. शिवाजी क्लस्टर शहापूर, टिळकवाडी,अनगोळ विभागाच्या अॅथलेटिक स्पर्धेत 112 गुणासह बालिका आदर्श विद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद तर मीरा संघाने 105 गुणांसह उपविजेतेपद पटकाविले. 15 गुणांसह अनुप हनगोजी (केएलएस) तर मुलींमध्ये समिक्षा करतसकर यांनी वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावरती घेण्यात आलेल्या या अॅथलेटिक स्पर्धेत बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ट अॅथलेटिक प्रशिक्षक ए. बी. शिंत्रे, एसकेई सोसायटीचे खजिनदार श्रीनाथ देशपांडे, आरपीडी महाविद्यालयाचे क्रीडा निर्देशक डॉ. रामकृष्ण एल., टिळकवाडी विभागीय शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विवेक पाटील, स्पर्धा संयोजक प्रवीण, मुख्याध्यापक सावित्री नाईक, गायत्री शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते.

Advertisement

पाहुण्यांचे स्वागत सावित्री नाईक यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पदके व प्रमाणपत्रे देवून गौरविण्यात आले. अॅथलेटिक विभागात मुलांमध्ये संतमीरा संघाने 45 गुणांसह तर मुलींमध्ये 44 गुणांसह बालिका आदर्शने विजेतेपद पटकविले. 15 गुणासह केएलएसच्या अनुज हनगोजी व समिक्षा करतसकर बालिका आदर्श हिने 12 गुणासह वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रामलिंग परीट, जयसिंग धनाजी, उमेश बेळगुंदकर, संतोष दळवी, अर्जुन भेकणे, उमेश मजुकर, सुनिता जाधव, मयुरी पिंगट, सिल्वीया डिलीमा, मॅथ्यु लोबो, अनिल मुगळीकर, आर. पी. वंटगुडी यांनी परिश्रम घेतले.
Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article