For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बालिका आदर्श, हेरवाडकर, शाळा क्र.5 विजेते

10:06 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
बालिका आदर्श  हेरवाडकर  शाळा क्र 5 विजेते
Advertisement

बेळगाव : छत्रपती शिवाजी क्लस्टर प्राथमिक विभाग टिळकवाडी, शहापूर, अनगोळ, एस केईसोसायटी कन्नड प्राथमिक शाळा आयोजित विविध सांघिक स्पर्धा संपन्न खो खो खेळ मुले विजेतेपद कन्नड हायर प्राथमिक शाळा नंबर 5 टिळकवाडी, उपविजेते आदर्श मराठी विद्यामंदिर शहापूर, मुली विजेते बालिका आदर्श विद्यालय, उपविजेते मुक्तांगण शाळा, कब्बडी स्पर्धा विभाग मुले विजेते एम व्ही हेरवाडकर शाळा.उपविजेते केएचपीएस भाग्यनगर, मुली विभाग विजेतेपद बालिका  आदर्श विद्यालय, उपविजेते केएचपीएस क्र. 18 पटकाविले. खो-खो स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात कन्नड प्राथमिक शाळा क्रे 5 ने आदर्श मराठी संघाचा 4 गड्यांनी पराभव केला. तर मुलींच्या अंमित सामन्यात बलिका आदर्श संघाने मुक्तांगण संघाचा एक डाव व 2 गड्यांनी पराभव करून विजेतेपद पटकाविले.

Advertisement

कब्बडी स्पर्धेत मुलांच्या गटात पहिल्या उपांत्य फेरीत एम.व्ही. हेरवाडकर संघाने आरसीनगर संघाचा 5 गुणानी तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात केएचपीएच भाग्यनगर संघाने संत मीरा संघाचा 2 गुणानी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत एम. हेरवाडकर संघाने  केएचपीएच भाग्यनगर संघाचा 13 गुणानी पराभव विजेतीपद मिळविले. मुलांच्या गटात उपांत्य फेरीत बालिका आदर्शने संघाने संघमित्र संघाचा 3 गुणांनी तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात केएचपीएच क्रमांक 18 संघाने संतमीरा संघाचा 2 गुणांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र अंतिम फेरीत बालिका आदर्श संघाने केएचपीएच क्र. 18 चा 18 गुणांनी पराभव करुन विजेतेपद मिळविले. या स्पर्धांना आयोजक शाळेच्या मुख्याध्यापिका सावित्री नायक क्रीडाशिक्षक प्रवीण पाटील रामलिंग परीट यांनी स्पर्धाना चालना दिले शिवाय पंच म्हणून उमेश मजूकर सी. आर. पाटील, उमेश बेळगुंदकर, विवेक पाटील, जनार्दन पाटील, अनिल काबळे आणि विविध शाळेच्या क्रीडा शिक्षकांनी पंच म्हणून कामगिरी करून स्पर्धा यशस्वी रित्या पार पाडल्या.

Advertisement
Advertisement
Tags :

.