महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इंग्लंड कसोटी संघातून बेअरस्टोला डच्चू

06:23 AM Jul 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

विंडीज विरुद्ध होणाऱ्या आगामी 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली. इंग्लंडच्या निवड समितीने रविवारी या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी 14 जणांचा संघ जाहीर केला. या संघातून जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांना वगळण्यात आले.

Advertisement

या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या इंग्लंड संघामध्ये तीन नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. आता नवोदित जेमी स्मिथकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी राहिल. नवोदित वेगवान गोलंदाज अॅटकिन्सन आणि पेनिंगटन यांना संधी देण्यात आली आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लिच यालाही या मालिकेसाठी निवड समितीने वगळले आहे. शोएब बशीर हा इंग्लंडच्या संघातील प्रमुख फिरकी गोलंदाज राहिल. बेअरस्टोने अलिकडेच कसोटीतील 100 सामन्यांचे उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर तो फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून झगडत असल्याचे दिसून आले. विंडीज आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी लॉर्ड्स मैदानावर 10 जुलैपासून सुरु होणार आहे. इंग्लंडचा वेगवान अनुभवी गोलंदाज 41 वर्षीय जेम्स अँडरसनची निवृत्तीपूर्वीची ही शेवटची कसोटी आहे. अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये 1304 गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. विंडीज विरुद्धच्या मालिकेसाठी ख्रिस वोक्सचे संघात पुनरागमन झाले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article