For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काळादिन सायकलफेरीतील म. ए. समिती कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

06:43 AM Oct 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
काळादिन सायकलफेरीतील म  ए  समिती कार्यकर्त्यांना जामीन मंजूर
Advertisement

मागीलवर्षी ठेवला होता ठपका

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने 1 नोव्हेंबर 2024 रोजी काळादिन पाळून सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देऊन भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा ठपका ठेवत कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणातील सात कार्यकर्त्यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. त्यांना शनिवारी जामीन मंजूर झाला आहे.

Advertisement

सायकलफेरीतून भाषिक तेढ निर्माण झाल्याचा ठपका ठेवत 45 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी सात कार्यकर्त्यांचा जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. मार्केट पोलीस स्थानकात सदर गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. जेएमएफसी द्वितीय न्यायालय येथे हा खटला सुरू असून 7 मे रोजी सुनावणी झाली होती. पुढील सुनावणी 22 फेब्रुवारी 2026 रोजी निश्चित करण्यात आली आहे.

शनिवारी झालेल्या सुनावणीत समितीचे कार्यकर्ते व युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, मदन बामणे, सचिन केळवेकर, संतोष कृष्णाचे, गणेश द•ाrकर, श्रीकांत कदम व गुंडू कदम यांना कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला. या खटल्याचे कामकाज अॅड. एम. बी. बोंद्रे, अॅड. महेश बिर्जे, अॅड. वैभव कुट्रे, अॅड. अश्वजित चौधरी यांनी पाहिले.

Advertisement
Tags :

.