कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बहरीनच्या अली दाऊदचा आगळा विक्रम

06:18 AM Dec 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / गेलेफू (भूतान)

Advertisement

बहरीन आणि भूतान यांच्यात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात बहरीनचा वेगवान गोलंदाज अली दाऊदने टी-20 प्रकारात दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी करताना 19 धावांत 7 गडी बाद केले.

Advertisement

33 वर्षीय अली दाऊदने या सामन्यात अचूक आणि वेगवान स्वीन गोलंदाजीवर भूतानचे 7 फलंदाज केवळ 19 धावांत बाद केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बहरीनने 20 षटकांत 160 धावा करत भूतानला 161 धावांचे आव्हान दिले. भूतानच्या डावामध्ये बहरीनच्या अली दाऊदने डावातील तिसऱ्या षटकांत 2 गडी बाद केले. भूतानची यावेळी स्थिती 3 बाद 11 अशी स्थिती होती. यानंतर भूतानच्या फलंदाजांनी चौथ्या गड्यासाठी 67 धावांची भागिदारी केली. डावातील 16 व्या षटकांत दाऊदने 3 गडी बाद केले. तर त्यानंतर आपल्या पुढील षटकांत त्याने आणखी 2 बळी मिळवित या सामन्यात 19 धावांत 7 गडी बाद करण्याचा विक्रम केला. बहरीनने हा सामना 35 धावांनी जिंकला. टी-20 प्रकारात आतापर्यंत मलेशियाच्या इद्रुसने 8 धावांत 7 गडी बाद करण्याचा विक्रम केला असून तो अद्याप अबाधित आहे. टी-20 प्रकारात आतापर्यंत एका सामन्यात सात बळी मिळविणारे इद्रुस आणि दाऊद हे दोनच गोलंदाज आहेत. या मालिकेत आता बहरीनने भूतानवर 3-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. या मालिकेतील पहिला सामना बहरीनने 8 गड्यांनी तर दुसरा सामना 6 गड्यांनी जिंकला आहे. पुरूषांच्या टी-20 प्रकारामध्ये गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांच्या इलाईट यादीमध्ये भारताच्या दीपक चहरने बांगलादेशविरुद्ध 2019 साली 7 धावांत 6 गडी बाद करण्याचा पराक्रम केल्याने भारताने तो सामना 30 धावांनी जिंकला होता. दीपक चेहरने या सामन्यात हॅट्ट्रीकही नोंदविली होती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article