सायकलिंग स्पर्धेत बागलकोट, विजापूर विजेते
बेळगाव : 16 व्या राज्यस्तरीय मुलामुलींच्या रोड सायकलिंग स्पर्धेत मल्लिकार्जुन, सौरभ सिंग, दया नागशेट्टी प्रशांत दानाप्पा श्रीनिवास एल. गंगा यादगिरी पूर्वी सिद्दनगोळ सिद्धलिंगा जक्कण्णवर प्रियांका लमाणी यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकाविले. पुरूष विभागात बागलकोट संघाने सर्वसाधारण विजेतेपद तर मुलींच्या विभागात विजापूर संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. ही स्पर्धा कर्नाटक राज्य हौशी सायकलिंग संघटना व बेळगाव हौशी जिल्हा सायकलिंग संघटना, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, युवा सबलीकरण क्रीडा विभाग बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने झाडशहापूर येथील राष्ट्रीय मार्गावर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय रोड
सायकलिंग स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे...
- पुरुष 23 वर्षाखालील गटात 30 कि. मी.-1) मल्लिकार्जुन शिराळ बागलकोट, 2) मल्लिकार्जुन यादवाड, बागलकोट 3) हर्दीक उडपी.
- पुरुष 30 कि. मी.-1) सौरभसिंग बेंगळूर 2) सुजल जाधव विजापूर 3) उदय धारवाड
- 18 वर्षाखालील गट 15 कि. मी.-1) दया नागशेट्टी विजापूर 2) आयशा मोमीन बागलकोट 3) ज्योती राठोड, विजापूर
- 16 वर्षाखालील गट 15 कि. मी.-1) प्रशांत दानाप्पा बेंगळूर 2) होन्नाप्पा धर्मट्टी चंदरगी, बेळगाव 3) पुनीत विजापूर
- 18 वर्षाखालील गटात-1) श्रीनिवास एल. विजापूर 2) नितेश पुजारी विजापूर 3) हणमंत यादगिरी
- महिला विभाग 20 कि. मी.-1) गंगा यादगिरी 2) टी. टी. शर्मा बेंगळूर 3) पायल विजापूर
- 16 वर्षाखालील गट 10 कि. मी-1) दिपीका 2) पूर्वी सिद्दनगोळ यादगिरी 3) नंदिनी लमाणी बागलकोट
- 14 वर्षाखालील मुलांचा गट 10 कि. मी.-1) सिद्धलिंगा जक्कण्णवर बागलकोट 2) अभिषेक विजापूर 3) बसवराज विजापूर
- 14 वर्षाखालील मुलींचा गट 7 कि. मी.-1) प्रियांका लमाणी 2) विद्या लमाणी 3) वर्षे
- 16 वर्षाखालील मुलांचा गट 20 कि. मी. -1) बसवराज विजापूर 2) विरेश यादगिरी 3) पुनीत विजापूर.
- 23 वर्षाखालील पुरुषांचा गट 80 कि. मी. -1) वरुण शिरूर बागलकोट 2) मंजू यादगिरी 3) मल्लिकार्जुन यादवाड बागलकोट
- 23 वर्षाखालील ओपन पुरुष गट 80 कि. मी. -1) सुजल जाधव विजापूर 2) श्रीशैल बागलकोट
- महिलांचा ओपन गट 40 कि. मी. -1) नंदा चचड बागलकोट 2) किर्ती नाईक धारवाड.
- 18 वर्षाखालील मुलांचा गट तीन फेरी -1) महेश बागलकोट 2) हणमंत यादगिरी 3) श्रीनिवास विजापूर.
- 18 वर्षाखालील मुलींचा गट एक फेरी -1) दया नागशेट्टी विजापूर 2)आयशा मोमीन 3) ज्योती विजापूर
- 16 वर्षाखालील मुलींचा गट एक फेरी -1) दिपा 2) मधु 3) गायत्री कित्तूर बागलकोट
- 14 वर्षाखालील मुलांचा गट एक फेरी -1) सिद्धलिंगा चिक्कण्णवर बागलकोट 2) अर्जुन कलाल धारवाड 3) बसवराज विजापूर
- 14 वर्षाखालील मुलींच गट एक फेरी -1) प्रियांका लमाणी गदग 2) विद्या लमाणी बागलकोट 3) भाग्य,गदग
यांनी विजेतेपद पटकाविले. बक्षीस वितरण प्रसंगी जय भारत फौंडेशनचे पदाधिकारी व राज्याध्यक्ष जी. बी. पाटील, सचिव एस. एम. कुरणी, पेट्रॉन विवेकराव पाटील, अध्यक्ष अनिल पोतदार, मोहन पत्तार, एम. पी. मरनूर, बाळू सुळेभावीकर व कर्नाटक राज्य हौशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राज्य पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.