महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाजप आल्यास मागासवर्गिय मुख्यमंत्री

05:45 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तेलंगणात मोठी घोषणा

Advertisement

तेलंगणा राज्यात भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळाल्यास राज्याला प्रथम मागसवर्गिय मुख्यमंत्री दिला जाईल, अशी महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते सोमवारपासून राज्याच्या दोन दिवसांच्या प्रचार दौऱ्यावर आलेले आहेत. ते राज्यात सहा प्रचारसभा घेणार असून तिरुपती देवस्थानलाही त्यांनी सोमवारी भेट दिली आणि पूजा तसेच प्रार्थना केली. देशातील सर्वांच्या आरोग्यासाठी आपण परमेश्वराकडे प्रार्थना केल्याचे त्यांनी नंतर स्पष्ट केले.

Advertisement

तेलंगणात सत्ता प्राप्त झाल्यास अन्य मागासवर्गिय समाजाचा मुख्यमंत्री केला जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही काही दिवसांपूर्वी प्रचारसभेत दिले होते. या राज्यात अन्य मागासवर्गियांची संख्या मोठी असून त्यांची एकगठ्ठा मते निवडणुकीचा परिणाम फिरवू शकतात.

एकाच नाण्याच्या दोन बाजू

राज्यातील सत्ताधारी भारत राष्ट्र समिती आणि आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही पक्षांची नावे भिन्न आहेत, तथापि, नियत एकच आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये राज्यात अनागोंदी माजली असून भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यास राज्याची अर्थव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था सुरळीत करण्यावर भर देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय प्राधान्याने घेतले जातील असे त्यांनी स्पष्ट केले.  गुन्हेगारी निपटून काढली जाईल, अशी अनेक आश्वासने त्यांनी यावेळी दिली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article