पुन्हा युद्धाच्या दारात
इराणनं प्रथमच आपल्या भूमीवरून इस्त्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला करून जगाला हादरा दिला आहे. जग पुन्हा युध्दाच्या दारात उभे राहणार आणि त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार म्हणून चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. आधीच युक्रेन, रशिया युध्दाचे जगावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यात हे नवे संकट निर्माण होऊ नये म्हणून तातडीने सुरक्षा परिषद हस्तक्षेप करण्याच्या स्थितीत आहे. पण खरोखरच इथे शांतता निर्माण होईल की वाद चिघळत जाईल याची जगाला चिंता आहे. इस्रायलच्या संरक्षण प्रणालीने इराणच्या क्षेपणास्त्रांना हवेतच प्रत्युत्तर दिले. मात्र यामुळे पश्चिम आशियावर युध्दाचे ढग दाटले आहेतच. या युध्दात संपूर्ण जग होरपळण्याची चिन्हे आहेत. काही ठराविक टार्गेट ठरवून हा हल्ला केला आहे असे हल्ल्याचे स्पष्ट समर्थन करतानाच इराणने म्हंटले आहे. त्यानी संयुक्त राष्ट्रांच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात, संयुक्त राष्ट्र चार्टरमधील कलम 51 मध्ये उल्लेख केल्यानुसार, इस्रायलच्या वारंवार होण्राया लष्करी आक्रमणाला प्रतिकार म्हणून स्व-संरक्षणासाठी हा हल्ला केला असे स्वत?च्या कृतीचे समर्थन केलेले आहे. इराणने इस्रायलच्या दिशेने सोडलेली काही क्षेपणास्त्रs अमेरिकेनेही निकामी केली आहेत. इस्रायलनेही संयुक्त राष्ट्रात पत्र लिहून इराणी सशस्त्र दलाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची मागणी सुरक्षा परिषदेकडे केली आहे. या पत्रात इराणने गाझामधील हमास, लेबनॉनमधील हिजबुल्लाह आणि येमेनमधील हौथींना पाठिंबा देऊन आंतरराष्ट्रीय दायित्वांचे उल्लंघन केल्याचा आणि अस्थिरतेला
प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तातडीने त्यांच्या युद्ध मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. या अभूतपूर्व घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एक एप्रिल 2024 रोजी सीरियातील इराणच्या दूतावासावर झालेला हल्ला इस्रायलनं केला होता, असा दावा इराणने केला. सीरियातील दूतावासावरील हल्ल्याचे परिणाम इस्रायलला भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे इराणकडून अशा हल्ल्याची अपेक्षा होतीच. भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते रणधीर जयस्वाल यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. भारताच्या निवेदनात म्हटले आहे की, इस्रायल आणि इराणमधील तणावामुळे या भागातील शांतता आणि सुरक्षेला धोका आहे. त्यामळे दोन्ही बाजूंना हिंसेपासून परावृत्त होण्याचा आणि मुत्सद्देगिरीचा वापर करून शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचा सल्ला देतो असे म्हंटले आहे. या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले जात आहे आणि तिथे राहण्राया भारतीय समुदायाशी संपर्क राखला जात आहे. असे म्हणून भारताने स्वत?ची प्रतिमा जपलेली आहे.
अपेक्षेप्रमणेच अमेरिका आणि इंग्लंड इस्त्रायलाच्याच पाठीशी राहिले आहे. ते त्यांचे समर्थन करणार हे निश्चित आहे. भारताला अशी भूमिका घेता येत नाही. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवत्ते ?ड्रिन वॉटसन यांनी जाहीर केल्यानुसार राष्ट्राध्यक्ष बायडन यांची भूमिका स्पष्ट आहे. इस्रायलच्या सुरक्षेला आमचा पाठिंबा आहे. अमेरिका इस्रायली नागरिकांच्या पाठीशी उभी राहील आणि इराणच्या या हल्ल्यांपासून स्वत?चा बचाव करण्राया इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा असेल! ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी इराणच्या या हल्ल्याचा निषेध केला असून, इस्रायलच्या आणि आमच्या सर्व प्रादेशिक भागीदारांच्या सुरक्षेसाठी इंग्लंड त्यांच्यासोबत उभा राहील. असे म्हंटले आहे. तर इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशन गार्ड कॉर्पसने सांगितलं आहे की, ठदमास्कसमधील इराणी दूतावासाच्या हल्ल्यासह झिओनिस्ट राजवटीने वारंवार केलेल्या गुह्यांचा बदला म्हणून हा हल्ला केला आहे. इराणने आता आम्ही आणखी हल्ले करणार नाही, पण इस्रायलने प्रत्युत्तरादाखल काही कारवाई केली किंवा अमेरिकेने हस्तक्षेप केला तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ. असा इशारा दिलेला आहे. या घटनेनंतर अमेरिकेने सामंजस्याने यावर तोडगा काढावा अशी अपेक्षा असेल. मात्र अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रविवारी ‘जी-7‘ राष्ट्रांची एक बैठक आयोजित केली ज्याचा उद्देश इराणच्या हल्ल्याला संयुक्तपणे प्रत्युत्तर देणे हा आहे. त्यांनी निवेदन प्रसिद्धीस देताना आपली टीम इस्रायलच्या नेत्यांच्या सतत संपर्कात राहील. इस्रायलमधील अमेरिकेच्या संपत्तीवर किंवा इमारतींवर हा हल्ला झालेला नसला तरी सर्व प्रकारच्या धोक्यांसाठी अमेरिका तयार आहे असे बायडन म्हणाले आहेत. आम्ही आमच्या नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कोणतंही पाऊल उचलायला मागेपुढे पाहणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. ही सर्वच वक्तव्ये काळजी वाढविणारी आहेत. पुतीन यांच्या सणकीपणामुळे जग गेले दोन वर्षें होरपळत आहे. अन्न साखळीच्या तुटवड्यामळे सगळ्या जगाला चिंता करावी लागली. महागाई टोकाला पोहोचली आणि खूप मोठ्या लोकासंख्येला उपासमारीला सामोरे जावे लागले. आता इराण युद्धामुळे 1989 साली इराक आणि इराण युद्ध होऊन जगाची झालेली ससेहोलपट अजून विस्मरणात गेलेली नाही. त्याचे पर्यावरणासह विविध परिणाम जग अजून भोगत आहे. अमेरिकेचे अनेक राष्ट्राध्यक्ष बदलले पण त्यांच्या धोरणाची काळी सावली जगावरून हटली नाही. इराणने नको तितके धाडस करून दाखवले आणि इस्त्रायल सुध्दा युध्दाची खुमखुमी असलेलेच राष्ट्र असल्याने या सर्वांच्या तावडीतून सुटून जगात शांतता नांदणे खूप अवघड झाल्याच्या काळात जगात अशा सर्वच राष्ट्रावर दबाव वाढवेल अशी ताकद निर्माण होण्याची आवश्यकता आहे.