महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बाबर आझमकडे कर्णधारपद : पाच नव्या चेहऱ्यांना संधी

06:29 AM May 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

Advertisement

आगामी टी 20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली. बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानचा संघ विश्वचषकात उतरणार आहे. पाकिस्तानच्या संघात मोहम्मद आमिरचे कमबॅक झाले असून मोहम्मद रिझवान आणि हॅरिस रौफ यांना संधी दिली आहे, पण त्यांच्या फिटनेसबाबत पीसीबी चिंतेत आहे. पाकिस्तानच्या ताफ्यात फिरकी अष्टपैलू मोहम्मद नवाज याला स्थान देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, 15 खेळाडूंपैकी अबरार अहमद, आझम खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, सैम अयुब आणि उस्मान खान या पाच नव्या चेहऱ्यांना संघात स्थान देण्यात आले आहे.

Advertisement

अमेरिका व विंडीजमध्ये पुढील आठवड्यापासून सुरु होणाऱ्या टी 20 विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या 15 सदस्यीय संघाची शुक्रवारी रात्री उशिरा घोषणा करण्यात आली. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली हा संघ दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. पाकिस्तानने 2009 मध्ये शेवटचा टी 20 विश्वचषक जिंकला होता. मात्र त्यानंतर हा संघ एकदाही चॅम्पियन बनू शकला नाही. संघात पाच वेगवान गोलंदाज, तीन यष्टीरक्षक आणि चार अष्टपैलू खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पीसीबीने अद्याप राखीव खेळाडूंची नावे जाहीर केलेली नाहीत. मोहम्मद अमीर हा स्पॉट फिक्सिंग प्रकरणामध्ये दोषी आढळला होता. त्याच्यावर 3 वर्षांची बंदीही घालण्यात आली होती. आता बऱ्याच वर्षांनंतर त्याचे राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे.

पाकिस्तानला भारतासोबत ‘अ’ गटात स्थान देण्यात आले असून या गटात आयर्लंड, कॅनडा आणि यजमान अमेरिका यांचाही समावेश आहे. 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतील. पाकिस्तानचा पहिला सामना 6 जून रोजी अमेरिकेविरुद्ध होणार आहे, तर दुसरा सामना भारतासोबत होईल. यानंतर त्यांचे सामने कॅनडा व आयर्लंडविरुद्ध होणार आहेत.

टी 20 वर्ल्डकपसाठी पाकिस्तान संघ - बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, सईम अयुब, फखर जमान, उस्मान खान, आझम खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शादाब खान, मोहम्मद अमीर, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि अबरार अहमद.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article