कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अझहरूद्दीनच्या नाबाद शतकाने केरळ मजबूत स्थितीत

06:50 AM Feb 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

Advertisement

रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरु असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मंगळवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर मोहम्मद अझहरूद्दीनच्या नाबाद शतकाच्या जोरावर केरळने गुजरात विरुद्ध पहिल्या डावात 7 बाद 418 धावा जमविल्या. अझहरूद्दीनचे हे प्रथमश्रेणी क्रिकेटमधील दुसरे शतक असून तो 17 चौकारांसह 149 धावांवर खेळत आहे. अझहरूद्दीन आणि सलमान निझार यांनी 6 व्या गड्यासाठी 149 धावांची भागिदारी केली.

Advertisement

केरळने 4 बाद 206 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि 69 धावांवर नाबाद राहिलेला कर्णधार सचिन बेबी नागवासवालाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याला कालच्या आपल्या धावसंख्येत एकही धावेची भर घालता आली नाही. त्याने 195 चेंडूत 8 चौकारांसह 69 धावा जमविल्या. सचिन बेबीने अझहरूद्दीनसमवेत 5 व्या गड्यासाठी 49 धावांची भर घातली.

सचिन बेबी बाद झाल्यानंतर मोहम्मद अझहरूद्दीन आणि सलमान निझार यांनी दमदार फलंदाजी करत 149 धावांची सहाव्या गड्यासाठी भागिदारी केल्याने केरळला 400 धावांचा टप्पा ओलांडता आला. उपहारावेळी केरळची स्थिती 5 बाद 293 अशी होती. चहापानापर्यंतच्या दुसऱ्या सत्रामध्ये केरळने 61 धावांची भर घालताना एकही गडी गमाविला नाही. चहापानावेळी केरळने 150 षटकात 5 बाद 354 धावा जमविल्या होत्या. मोहम्मद अझहरूद्दीनने 175 चेंडूत 13 चौकारांसह शतक तर सलमान निझारने 185 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक झळकाविले. जयस्वालने निझारला पायचीत केले. अहमद इम्रानने 66 चेंडूत 3 चौकारांसह 24 धावा केल्या. दिवसअखेर अझहरूद्दीन 149 तर सरवटे 10 धावांवर खेळत आहेत. गुजराततर्फे नागवासवालाने 64 धावांत 3 तर पी. जडेजा, बिश्नोई, आणि जयस्वाल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक - केरळ प. डाव 177 षटकात 7 बाद 418 (मोहम्मद अझहरूद्दीन खेळत आहे 149, सलमान निझार 52, अक्षय चंद्रन 30, कुनूमल 30, नयनार 10, सचिन बेबी 69, सक्सेना 30, अहमद इम्रान 24, सरवटे खेळत आहे 10, अवांतर 14, नागवासवाला 3-64, जडेजा, बिश्नोई, आणि जयस्वाल प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article