For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अझहर मेहमूदकडे प्रशिक्षकपद ?

06:35 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
अझहर मेहमूदकडे प्रशिक्षकपद
Advertisement

वृत्तसंस्था/ लाहोर

Advertisement

पाकचा माजी अष्टपैलू अझहर मेहमूदकडे नजीकच्या काळात पाक क्रिकेट संघाच्या साहाय्यक प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पाक आणि न्यूझीलंड यांच्यात पाकमध्ये होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी पीसीबीने अझहर मेहमूदची हंगामी प्रमुख प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. पीसीबीने पाक संघासाठी कायमस्वरूपी विदेशी प्रशिक्षक नियुक्त करण्याकरिता ऑस्ट्रेलियाचे जेसन गिलेस्पी आणि दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन यांच्याशी करारासंदर्भात चर्चा सुरू ठेवली आहे. गॅरी कर्स्टन हे पाक संघाच्या वन डे आणि  टी-20 साठी प्रमुख प्रशिक्षक तर गिलेस्पी कसोटीसाठी प्रमुख प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहतील, असा अंदाज पाक क्रिकेट वर्तुळामध्ये व्यक्त केला जात आहे. पाक संघाच्या साहाय्यक प्रशिक्षकपदी कसोटी, वन डे आणि  टी-20 या तीन प्रकारासाठी अझहर मेहमूदकडे साहाय्यक प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्याची तयारी पीसीबीने दर्शविली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.