For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

2019 च्या डुंगरपूर प्रकरणी आझम खान निर्दोष

06:24 AM Jun 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
2019 च्या डुंगरपूर प्रकरणी आझम खान निर्दोष
Advertisement

तुरुंगात कैद सप नेत्याला मोठा दिलासा

Advertisement

वृत्तसंस्था/ रामपूर

उत्तरप्रदेशच्या सीतापूर तुरुंगात कैद समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. डुंगरपूर प्रकरणातील एका खटल्यात रामपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयाने आझम यांच्यासमवेत 8 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. 2019 मध्ये डुंगरपूर प्रकरणी 13 गुन्हे नोंद झाले होते. 2016 मध्ये  सप सरकार असताना आझम खान यांच्या इशाऱ्यानुसार घरात घुसून मारहाण, तोडफोड आणि धमकाविल्याचा आरोप होता.

Advertisement

याप्रकरणी आझम खान, शाहजेब खान, फसाहत अली शानू, बरकत अली ठेकेदार, इमरान आणि इकराम विरोधात सुनावणी सुरू होती. मागील सुनावणीत दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने स्वत:चा निर्णय राखून ठेवला होता.  न्यायालयाने सोमवारी याप्रकरणी निर्णय दिला आहे.

यापूर्वी 30 मे रोजी डुंगरपूर प्रकरणातील एका खटल्यात आझम खान यांना दोषी ठरवत 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तसेच न्यायालयाने 14 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. आझम खान यांच्यावर डुंगरपूर वस्ती बळजबरीने रिकामी करविणे, मारहाण-तोडफोड, लूट आणि धमकाविण्याचा आरोप होता. ही घटना डिसेंबर 2016 मध्ये घडली होती, परंतु याप्रकरणी 2019 मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

Advertisement
Tags :

.