महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘तरुण भारत’ मध्ये आयुष्मान भारत योजना नावनोंदणी-जागृती शिबिर

10:41 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : केंद्र सरकारकडून नागरिकांच्या आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आयुष्मान भारत योजना नावनोंदणी व जागृती शिबिर शुक्रवारी ‘तरुण भारत’च्या मुख्य कार्यालयात आयोजिले होते. ‘तरुण भारत’ परिवारातील कर्मचाऱ्यांचे आयुष्मान भारत कार्ड काढले. बेळगाव तालुका आरोग्य विभागातर्फे शिबिर घेतले. या योजनेंतर्गत बीपीएल कार्डधारकाच्या एका कुटुंबासाठी 5 लाखांपर्यंतच्या उपचाराची सवलत तर एपीएल कार्डधारकासाठी दीड लाख अशी आहे. सर्वप्रथम सरकारी दवाखान्यात किंवा हॉस्पिटलमध्ये तपासणी करून घेणे आवश्यक आहे. या हॉस्पिटलने रेफरन्स दिला तरच खासगी दवाखान्यामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये उपचार घेता येतात. ग्राहक आपल्या मोबाईलवरूनही आयुष्मान भारत या अॅपद्वारे नोंदणी करू शकतात. शुक्रवारी नार्वेकर गल्ली येथील ‘तरुण भारत’ मुख्य कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी नावनोंदणी शिबिर आयोजिले होते. तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजीव डुमगोळ, ‘तरुण भारत’चे जनसंपर्क अधिकारी गिरिधर रवीशंकर, एचआर व्यवस्थापक संतोष घोरपडे यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आयुष्मान भारत योजनेचे महत्त्व यासंदर्भात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article