आयुर्वेदाचार्य डॉ. वीरधवल पाटील यांचा सुश्रुत पुरस्काराने सन्मान
सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. पराग कालकर यांच्या हस्ते गौरव : पुण्यातील मंगल फाउंडेशनतर्फे तज्ञ डॉक्टरांच्या योगदानाचे कौतुक
कोल्हापूर प्रतिनिधी
पुणे येथील मंगल फाउंडेशन च्या वतीने येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. वीरधवल पाटील यांचा सुश्रुत पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. पराग कालकर यांच्या हस्ते डॉ. पाटील यांना गौरविण्यात आले. पुण्यातील कोंढवा स्थित इस्कॉन मंदिरात हा पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यामध्ये डॉ. वीरधवल पाटील यांच्या बरोबरीनेच डॉ. व्यंकट धर्माधिकारी, डॉ. एम. डी. समुद्रे, डॉ. रविशंकर पेरवाजे, डॉ. शितल असुतकर , डॉ. प्रशांत दौंडकर, डॉ. गजानन धाडवे यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. मंगल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुणाल कामठे, डॉ. शर्मिला कामठे यांनी पुरस्कार सोहळा विषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, डॉ. मिलिंद भोई, योगेश टिळेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आयुर्वेदातील एमडी आणि एमएस आणि रूग्णसेवा
आयुर्वेदाचार्य डॉ. वीरधवल पाटील हे कोल्हापुरातील ज्येष्ठ विधिज्ञ (कै.) तथा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अॅड. शामराव भाऊसाहेब तथा एस. बी. पाटील-शिरोळकर यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी आयुर्वेदामध्ये एमडी आणि एमएस पदवी संपादन केल्या आहेत. मुळव्याध विषयी उपचारात त्यांचे वैशिष्ट्यापूर्ण संशोधन आहे. गेली बावीस वर्षे ते वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून रूग्णसेवा करत आहेत. हजारो रुग्णांवर त्यांनी उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या आहेत. पुण्यातील प्रतिष्ठेच्या सुश्रुत पुरस्काराने गौरव झाल्याने डॉ. पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.