कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कडोलीचा अयोध्या क्रिकेट संघ विजेता

09:56 AM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /काकती

Advertisement

Advertisement

येथील ठकाप्पणा आमराईत राहुल करंडक ट्रॉफी तालुका ग्रामीण क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील 84 संघांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते राहुल जारकीहोळी होते. तर उद्घाटक माजी जि. पं. सदस्य सिद्दगौडा सुणगार, प्रमुख पाहुण्या ग्रा. पं. अध्यक्षा वर्षा मुचंडीकर, माजी ग्रा. पं. अध्यक्ष सुनील सुणगार इतर मान्यवर होते. माजी जि. पं. सदस्य सिद्दगौडा सुणगार व मान्यवरांनी रितसर उद्घाटन केले. तसेच स्पर्धेत अयोध्या क्रिकेट संघ कडोलीने अंतिम सामन्यात विजय प्राप्त केला तर उपविजेत्या राजगोळी संघ ठरला. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मुचंडीकर, प्रवीण रेडकर, सागर पिंगट, परशराम बेळगावी, सुनील बजंत्री आदींनी विजेत्या संघांना राहुल ट्रॉफी व वैयक्तिक पदक देऊन सन्मानित केले. तर उत्कृष्ट फलंदाज आकाश कटांबळेला गौरविण्यात आले. यावेळी लक्ष्मण मुचंडीकर यांनी आपले विचार मांडले. यावेळी मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article