महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ए.वाय पाटील यांचे कार्यकर्ते के.पीं.पाटील यांच्या गळाला

06:04 PM Feb 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बहुतांशी खंदे समर्थक के.पीं.च्या संपर्कात; ए वाय कार्यकर्त्यांचा सकारात्मक प्रतिसाद; लवकरच जाहीर मेळाव्यात होणार शिक्कामोर्तब; मेहुण्या-पाहुण्यांचा राजकीय संघर्ष अधिकच तीव्र

Advertisement

भोगावती/प्रतिनिधी

Advertisement

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी मतदार संघातील जुळवाजुळवीला सुरुवात झाली असल्याचे दिसते. त्यामधून अचानक राजकीय धक्कातंत्र देण्याचे प्रकार घडत आहेत. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांचे भोगावती व दूधगंगा नदीकाठावरील व दोन्ही कारखाना कार्यक्षेत्रातील बहुतांशी खंदे समर्थक माजी आमदार के.पी.पाटील यांच्या गळाला लागले आहेत.ही सर्व स्वाभिमानी कार्यकर्ते मंडळी लवकरच एका जाहीर मेळाव्यात के.पी.गटांमध्ये जाहीर प्रवेश करणार असून के पींच्या एकमुखी नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. यासंदर्भात एका नेत्याने वृत्ताला गुरुवारी दुजोरा दिला असल्यामुळे मेहुण्या-पाहुण्यांचा हा राजकीय संघर्ष भविष्यात अधिकच उघडपणे होण्याची शक्यता आहे.यासाठी जिल्ह्यातील एका बड्या नेत्यांचा आशिर्वाद असल्याचे बोलले जाते.

यापूर्वी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ए वाय यांना पुढे आणून खुद्द केपी पाटील यांनीच त्यांच्या राजकीय प्रवासाचा आरंभ केला. त्यानंतर के पींच्या कृपाशीर्वादाने ए वायना तालुक्यासह जिल्हा पातळीवरील अनेक पदावर सहजपणे संधी मिळाली.त्यानंतर काही वर्षे मेहुण्या-पाहुण्यांत सख्य होते.मात्र आपलीच ताकद वाढली अशा समजूतीने त्यांना नेतेगिरीचा भास झाला.दरम्यान ए वाय यांना बिद्रीचे अध्यक्षपद व आमदारकीचे डोहाळे लागले.यासाठी त्यांनी मेव्हुणे के पी यांच्यावर राजकीय कुरघोडी करण्याचा सपाटा लावला.त्यानंतर मात्र राधानगरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील व माजीआमदार के.पी.पाटील या मेहुण्या-पाहुण्यांमधील राजकीय संघर्ष संपूर्ण जिल्ह्यांने पाहिला.या संघर्षाचा फटका के.पी.ना.विधानसभेवेळी बसला हे सर्वश्रुत आहे.

परवा झालेल्या बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत ए.वाय.पाटील यांनी के.पी.चे.राजकीय विरोधक आमदार प्रकाश आबीटकर यांच्याशी उघडपणे हातमिळवणी करुन धक्का दिला.परंतु या निवडणुकीतही के.पी.नी.ए वायना धक्का देत मोठ्या मताधिक्याने बिद्रीची एकतर्फी सता घेतली.यामध्ये राधानगरी तालुक्यातुन ए.वाय.यांच्यासह विरोधी पँनेलला अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही.याशिवाय खुद्द ए.वाय.सुध्दा मोठ्या फरकाने पिछाडीवर राहीले.परिणामी ए.वाय.यांना नामुष्कीजनक पराभुत व्हावे लागले. त्यानंतर राजकारणात मुत्सद्दी असणाऱ्या के.पीं.नी.राजकीय जुळवाजुळवीस सुरुवात केली.याला ए वाय यांची बदललेली वर्तणूक व भाजपा प्रवेशाच्या अफवांचाही थेट संबंध आहे. त्यामुळे राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादीला मानणारे बहुतांश स्वाभिमानी प्रमुख नेते,कार्यकर्ते के.पीं.च्या.संपर्कात आले असुन लवकरच त्यांचा प्रवेश निश्चित होईल.त्यादृष्टीने राजकीय हालचाली गतीमान झाल्या असुन बहुतांश प्रमुखांनी थेट के.पीं.ना सकारात्मक निर्णय दिल्याचे समजते,तसे झाले तर के.पीं.चा मास्टरस्ट्रोक भोगावती, बिद्री परिसरासह राधानगरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय दिशाच बदलुन टाकण्याची दाट शक्यता आहे.

भोगावतीच्या स्विकृत पदाचे गाजर

भोगावती परिसरातील काही ए.वाय.समर्थकांना भोगावतीच्या स्विकृत संचालकपदाच्या गाजराची अजूनही अपेक्षा आहे.त्यामुळे बोटावर मोजण्याइतकेच समर्थक जर - तर वर अवलंबून असुन स्विकृत चे पद पदरात पडले नाही.तर हीसुध्दा मंडळी के.पी.च्या गटात जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे ए वाय एकाकी पडतात की काय ? हे येणारा काळच ठरविण्याची साशंकता व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article