For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘अॅक्सिओम-4’चे आता 19 जून रोजी प्रक्षेपण

06:30 AM Jun 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘अॅक्सिओम 4’चे आता 19 जून रोजी प्रक्षेपण
Advertisement

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अॅक्सिओम-4 मोहिमेच्या प्रक्षेपणाबाबत नवीनतम अपडेट आले आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे शनिवारी यासंबंधी 19 जून ही नवी तारीख जाहीर केली. ‘भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणाऱ्या अॅक्सिओम-4 मोहिमेची प्रक्षेपण तारीख आता 19 जून 2025 रोजी निश्चित करण्यात आली आहे’ असे ट्विट जितेंद्र सिंह यांनी केले. स्पेसएक्स टीमने याची पुष्टी केली असून यापूर्वी प्रक्षेपणामध्ये निदर्शनास आलेल्या सर्व समस्या पूर्णपणे सोडविण्यात आल्या आहेत. पुढील कोणतेही अपडेट वेळेनुसार शेअर केले जातील, असेही त्यांनी सांगितले. यापूर्वी 11 जून रोजी काही तांत्रिक अडचणीमुळे मोहीम पुढे ढकलावी लागली होती. मोहिमेची प्रक्षेपण तारीख बदलण्याची ही चौथी वेळ होती.

Advertisement

अॅक्सिओम-4 मोहीम भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. या मोहिमेत कॅप्टन शुभांशू शुक्ला हा भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार आहेत. 39 वर्षीय शुभांशू शुक्ला यांचा जन्म लखनौमध्ये झाला. जून 2006 मध्ये त्यांना भारतीय हवाई दलात नियुक्ती मिळाली. त्यांना 2000 तासांहून अधिक उ•ाणाचा अनुभव आहे. त्यांनी सुखोई-30 एमके 1, मिग-21, मिग-29, जग्वार, हॉक, डोर्नियर आणि एएन-32 सारखी लढाऊ विमाने उडवली आहेत. हे अभियान भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासाठीही महत्त्वाचे असेल. ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर विशेष प्रयोग करणार असल्यामुळे प्रत्येक भारतीय या मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाची वाट पाहत आहे.

Advertisement
Tags :

.