‘अॅक्सिओम-4’चे उड्डाण एक दिवसाने लांबणीवर
बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता झेपावणार
वृत्तसंस्था/ फ्लोरिडा
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि इतर तीन जणांना अंतराळात घेऊन जाणाऱ्या ‘अॅक्सिओम-4’चे उड्डाण एका दिवसाने लांबणीवर पडले आहे. आता हे उड्डाण मंगळवारऐवजी बुधवार दि. 11 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता होणार असल्याचे ‘नासा’ने जाहीर केले आहे. खराब हवामानामुळे ऐनवेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘अॅक्सिओम-4’ ही मोहीम मानवी अंतराळ उ•ाणासाठी फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून उ•ाण करणार आहे. सुमारे 28 तासांच्या प्रवासानंतर हे अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) पोहोचतील. ही मोहीम व्यावसायिक अंतराळ उड्डाणासाठी हे एक मैलाचा दगड ठरणार असल्यामुळे त्याच्याकडे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे.
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासोबत मिशन कमांडर पेगी व्हिटसन, हंगेरीचे तज्ञ टिबोर कापू आणि पोलंडचे स्लावोज उजनांस्की-विस्निव्स्की हे ‘आयएसएस’च्या अॅक्सिओम-4 (एएक्स4) व्यावसायिक मोहिमेत सहभागी असतील. चारही अंतराळवीर एलोन मस्कच्या कंपनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून उ•ाण करतील. अॅक्सिओम-4 मिशन फाल्कन-9 रॉकेटमधून प्रक्षेपित केले जाईल.