शेतात खुर्ची उगवणारा अवलिया
7 वर्षांपूर्वी द्यावी लागते ऑर्डर
हे जग अजब गोष्टी आणि लोकांनी भरलेले आहे. आज एका अशाच अनोख्या व्यक्तीची जोरदार चर्चा होत आहे. हा इसम खुर्ची तयार करण्याऐवजी उगविण्याचे काम करतो. या कामात त्याला भरपूर वेळ आणि मेहनत करावी लागते, परंतु या कामातील नफा ऐकून तुम्ही चकित व्हाल. सर्वसाधारणपणे तुम्ही शेतांमध्ये शेतकऱ्यांना फळभाज्याचे पिक घेताना पाहिले असेल. परंतु एक इसम शेतात फर्निचरचे पीकच घेतो. त्याने उगविलेल्या खुर्च्यांना मोठी मागणी असली तरीही त्याची किंमत देणे सर्वांना शक्य नाही.
गॅविन यांच्या या कामामध्ये त्यांची पत्नी एलिस देखील मदत करते. जर कुणाला खुर्ची खरेदी करायची असल्यास त्याला किमान 7 वर्षांपूर्वी ऑर्डर द्यावी लागते. यानंतर खुर्ची प्राप्त होऊ शकते. याप्रकारच्या एका खुर्चीची किंमत 6-7 लाख रुपये इतकी आहे. अधिक वेळ आणि मेहनत लागत असल्याने याची किंमत अधिक असल्याचे गॅविन यांचे सांगणे आहे.