महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

म. ए. समितीच्या रास्ता रोकोबाबत खानापूर शहरात जागृती फेरी

10:32 AM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शिनोळी येथे आज होणारा रास्ता रोको यशस्वी करण्याचे आवाहन

Advertisement

खानापूर : अधिवेशनाला विरोध म्हणून मध्यवर्ती समितीच्यावतीने रास्ता रोकोचे आयोजन सोमवार दि. 4 रोजी करण्यात आले आहे. याबाबत शहरात जनजागृती करण्यात आली. यावेळी शिवस्मारक येथून शहरातील प्रमुख मार्गावरुन पत्रके वाटून रास्ता रोकोला उपस्थित राहण्यासंदर्भात मराठी भाषिकांना आवाहन करण्यात आले. या जागृती फेरीत आबासाहेब दळवी, देवाप्पा गुरव, प्रकाश चव्हाण, कृष्णा कुंभार, संजीव पाटील, पांडुरंग सावंत, कृष्णा मन्नोळकर, पुंडलिक पाटील, भीमसेन करंबळकर, विवेकानंद पाटील, एन. जे. गुरव, तुळजाराम गुरव, टोपाण्णा कालमणकर, राजेंद्र कुलम, राजाराम देसाई, म्हात्रू धबाले आणि इतर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी माजी अध्यक्ष देवाप्पा गुरव यांनी आजचा रास्ता रोको यशस्वी करून आम्हा मराठी भाषिकांना कर्नाटकाच्या गुलामगिरीतून सुटका करून घ्यायची आहे. आणि महाराष्ट्रात सामील होऊन हा सीमाप्रश्न लवकरात लवकर सुटावा, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

Advertisement

रास्ता रोकोला उपस्थित राहण्याचे आवाहन

कर्नाटक अधिवेशनाला विरोध करण्यासाठी शिनोळी येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व मराठी भाषिकांनी या रास्ता रोको शिनोळी येथे उपस्थित रहावे, असे आवाहन आबासाहेब दळवी यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article