Sangli News : सांगलीत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जनजागृती रॅली उत्साहात
दिव्यांग दिन रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
सांगली : जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने महानगरपालिका आणि दिव्यांग कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
साखर कारखाना चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येवून रॅलीला सुरुवात होऊन डेक्कन हॉल येथे समारोप करण्यात आला. या उपक्रमात शहरातील विविध दिव्यांग विशेष शाळा, दिव्यांगकार्यशाळा, सांस्कृतिक पथके तसेच मोठ्या संख्येने दिव्यांग विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आणि आरोग्य जागरूकता, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छता, वैयक्तिक आरोग्य, रोगप्रतिबंधक उपाय व स्वच्छ शहर निर्मितीबाबत नागरिकांना जागरूकता पटवून दिली.
समाजाचा अविभाज्य घटक म्हणून दिव्यांग व्यक्तींना समान स्थान, संधी व सहभाग मिळावा, हा मुख्य संदेश विविध फलक, बॅनर आणि घोषणांद्वारे देण्यात आला. शिक्षण, आरोग्य, वाहतूक, प्रशासन या सर्व क्षेत्रांमध्ये दिव्यांग अनुकूल पायाभूत सुविधा उभारण्याचे महत्व रॅलीतून अधोरेखित करण्यात आले.
यावेळी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी महेश धोत्रे, मंजिरी माने, सुनील चौगुले, दिनेश गडवी, रोहित कांबळे, सचिन सागवकर याकूब मद्रासी, सिद्धांत ठोकळे, किशोर कांबळे, धनंजय कांबळे, अमोल घणके, गणेश कांबळे व कर्मचारी उपस्थित होते.