वेंगुर्ल्यात १८, १९ जानेवारीला जागृती महोत्सव
प्रतिनिधी
वेंगुर्ले
वेंगुर्ले येथील जागृती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळातर्फे घेण्यात येणारा जागृती महोत्सव १८ व १९ जानेवारी रोजी वेंगुर्ले मटवाडी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. बालवाडी ते दहावीपर्यंतच्या मुलांसाठी विविध स्पर्धा, जिल्हास्तरीय भव्य मॅरेथॉन स्पर्धा व माय-लेकरू नृत्य स्पर्धा हे महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. जागृती महोत्सवाचे हे ३६ वे वर्ष असून दरवर्षीच वेंगुर्ले तालुक्यातील मुलांचा उदंड प्रतिसाद या महोत्सवाला लाभतो.शनिवार १८ जानेवारी रोजी सायंकाळी ठिक ५ वाजता वालवाडी शिकणाऱ्या २ ते ६ वर्ष वयोगटातील मुलांसाठी बडबडगीत स्पर्धेने या महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. स्पर्थकांनी मराती किंवा हिंदी भाषेतील कोणतेही एक बडबडगीत किंवा बालगीत सादर करणे अपेक्षित आहे. यासाठी कमाल ३ मिनिटे एवढा वेड निर्धारित करण्यात आला आहे. प्रथम पाच क्रमांकांना भेटवस्तू प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.सायंकाळी ठिक ६.३० वाजता बालवाडी गटासाठी एकेरी नृत्य स्पर्चा होणार आहे. स्पर्धेसाठी कमाल ३ मिनिटांचा वेळ दिला जाईल. प्रथम पाच क्रमांकांना भेटवस्तू प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतर ठिक ७.३० वाजता पहिली ते चौथी व पाचवी ते दहावी या गटासाठी समूहनृत्य स्पर्धा होणार आहे. लहान गटासाठी १०००, ७००, ५०० तर मोठ्या गटासाठी १५००, १०००, ७०० रुपये तसेच प्रथम पाच क्रमांकासाठी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी एका समूहात किमान पाच मुलांचा सहभाग अनिवार्य आहे.रविवार दिनांक १९ रोजी सकाळी ठिक ६.३० वाजता कॅप्म येथील मैदानावर जिल्हास्तरीय मैरेचॉन स्पर्धा होणार आहे. एकूण १२ गटात ही स्पर्धा होणार आहे. बालवाडी गटातील मुली व मुलगे या दोन गटातील प्रथम तीन क्रमांकासाठी आकर्षक भेटवस्तु, प्रथम पाच क्रमांकासाठी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. पहिली ते दुसरी या गटातील मुलगे व मुली तसेच तिसरी ते चौथी मुलगे व मुली या चार गटातील पहिल्या तीन क्रमांकासाठी रोख ५००, ३००, २०० रुपये व प्रथम पाच क्रमांकांसाठी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.पाचवी ते सातवी मुलगे व मुली या दोन गटातील पहिल्या तीन क्रमांकांसाठी रोख ७००, ५००, ३०० रुपये, प्रथम पाच क्रमांकासाठी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे देण्यात येणार आहे. आठवी ते दहावी मुलगे व मुली या गटातील प बम तीन क्रमांकांसाठी रोख १०००, ७००, ५०० व प्रथम पाच क्रमांकांसाठी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल.
खुल्या गटातील पुरुष व महिला या दोन गटातील प्रथम तीन क्रमांकांसाठी रोख २०००, १५००, १००० व प्रथम पाच क्रमांकांसाठी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. बालवाडी गटासाठी ५० मीटर, पहिली ते दुसरीसाठी २०० मीटर, तिसरी ते पाचवी गटासाठी ५०० मीटर, पाचवी ते सातची गटासाठी १ किलोमीटर, आठवी ते दहावी गटासाठी २ किलोमीटर व खुल्या गटासाठी ५ किलोमीटर अंतर निर्धारित करण्यात आले आहे.त्यानंतर ठिक १० वाजता सिद्धिविनायक मंगल कार्यालयात बालवाडी गटासाठी रंगभरण व शालेय गटासाठी चित्रकला स्पर्धा होणार आहे. बालवाडी गटातील प्रथम पाच क्रमांकांना भेटवस्तु, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. पहिली ते चौची गटासाठी माझा आवडता प्राणी हा विषय असून प्रथम तीन विजेत्यांना रोख ५००, ३००, २०० रुपये, पाचवी ते सातवी गटासाठी वृक्षारोपण हा विषय असून तीन क्रमांकांना रोख ७००, ५००, ३०० तर आठवी ते दहावी गटासाठी स्वच्छता अभियान हा विषय असून प्रथम तीन विजेत्यांना रोख १०००, ७००, ५०० रुपये व तिन्ही गटातील प्रथम पाच विजेत्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. सायंकाळी ठिक ५ वाजता याच ठिकाणी बालवाडी व शालेय गटासाठी वेशभूषा स्पर्धा होणार आहे. बालवाडी गटासाठी मनपसंत वेषभूषा करता येईल. प्रथम पाच विजेत्यांना भेटवस्तू प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. पहिली ते चौची गटासाठी प्रथम तीन क्रमांकांना रोख ५००, ३००, २०० रुपये, पाचवी ते सातवी गटासाठी रोख ७००, ५००, ३०० रुपये तर आठवी ते दहाची गटासाठी रोख १०००, ७०० व ५०० रुपये अशी बक्षिसे याशिवाय तिन्ही गटातील प्रथम पाच विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सायंकाळी ठिक ७.३० वाजता जिल्हास्तरीय माय-लेकरू जोडी नृत्य स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत वयोगटाचे बंधन नाही. आई व मूल किंवा बाबा व मूल यांनी नृत्य करणे अपेक्षित आहे. प्रथम तीन विजेत्यांना रोखा १५००, १०००, ५०० रुपये अशी बक्षिसे देण्यात येतील. याशिवाय पहिल्या पाच विजेत्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येईल. मॅरेथॉन व माय-लेकरू जोडी नृत्य स्पर्धा सोडल्यास उर्वरित सर्व स्पर्धा वेंगुर्ले तालुक्यातील शाळांसाठी मर्यादित आहेत. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी स्पर्धाप्रमुख एश्वर्या मालवणकर यांच्याशी ९४२३७९३०३४ या क्रमांकावर संपर्क साथवा, असे आवाहन जागृती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष दिलीप मालवणकर यांनी केले आहे.