देशभक्त गव्हाणकर महाविद्यालयात युवा महोत्सव उत्साहात
सावंतवाडी प्रतिनिधी
येथील देशभक्त शंकरराव गव्हाणकर महाविद्यालयात ६ ते ११ जानेवारी या कालावधीत पाच दिवसीय युवा महोत्सव सुरु असून या महोत्सवाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन लोकमान्य ट्रस्टचे संचालक तथा संवाद तरुण भारतचे वितरण व्यवस्थापक सचिन मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून तरुण भारत संवादचे पत्रकार तथा कोकण मराठी साहित्य परिषदचे तालुकाध्यक्ष ऍड . संतोष सावंत ,लोकमान्य ट्रस्टचे सीनियर एक्झिक्युटिव्ह प्रवीण प्रभू केळुस्कर,प्राचार्य यशोधन गवस आधी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ऍड . संतोष सावंत म्हणाले , युवा महोत्सवातून विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव द्यावा . यातून मुंबई विद्यापीठाच्या उडान महोत्सवात आपली चमक दाखवावी. आपण ज्या महाविद्यालयात शिकून मोठे होतो त्यानंतर आपण त्या महाविद्यालयाचे कायम स्मरण करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. यावेळी प्रवीण प्रभू केळुसकर यांनी लोकमान्य ट्रस्टच्या माध्यमातून उच्च पदवी शिक्षण देणारे दालन उभे आहे. या माध्यमातून विद्यार्थी घडवले जात आहेत असे ते म्हणाले. यावेळी प्राचार्य श्री गवस यांनी ६ ते ११ जानेवारी या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम , पाककला, क्रीडा स्पर्धा असे विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळत आहेत. मुंबई विद्यापीठाचा उडान महोत्सव फेब्रुवारी महिन्यात आहे. याचे यजमानपद आपल्या महाविद्यालयाला मिळाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीने आपली कला सादर करावी असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी आदिती कळंगुटकर. व प्रणय गावडे तर आभार माया गवस यांनी मानले. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक आनंद नाईक ,साईप्रसाद पंडित ,अस्मिता गवस ,शैलेश गावडे ,मेधा मयेकर, यांचे विशेष सहकार्य लाभले .आज दिवसभर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला . ट्रॅडिशनल डे व फूड फेस्टिवल संपन्न झाले असून उद्या १० व ११ जानेवारीला दोन दिवस क्रीडामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .