राष्ट्रीय मतदार दिनातर्फे विद्यार्थ्यांची जागृतीफेरी
बेळगाव : राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर मतदान करण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करण्याबरोबरच मतदार यादीत नावे समाविष्ट करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जागृती फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी हिरवे निशान दाखवून जागृती फेरीला चालना दिली. कित्तूर चन्नम्मा चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानमार्गे अयोध्यानगर, कोल्हापूर सर्कल येथून कुमार गंधर्व रंगमंदिरपर्यंत जागृती फेरी काढण्यात आली. या जागृतीफेरीमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थी, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, मंजुनाथ जानकी, उदयकुमार तळवार, माहिती आणि प्रसारण खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर आदी उपस्थित होते.