पाणलोट यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावागावात जनजागृती
विविध कार्यक्रम ; झोळंबे येथे जलपूजन जनजागृती फेरी
ओटवणे प्रतिनिधी
शासनाची पाणलोट यात्रा लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत असून या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या पाणलोट यात्रेनिमित्त जनजागृती झोळंबे गावात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी गावातील सात वाडीतून पाणी व माती आणून या कलशाचे झोळंबेउपसरपंच विनायक गाडगीळ यांच्याहस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणलोट यात्रा लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातून सुरू होणार आहे. या यात्रेनिमित्त गावागावात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी प्रकल्प समन्वयक नितीन सावंत यांनी रथयात्रेची माहिती दिली. देऊन मृद व जलसंधारण विभागाच्या राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.तसेच पाणलोट यात्रा यावेळी जल व मृद् संवर्धन यासंदर्भात घोषणा देण्यात आल्या.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली. शाळेतील विद्यार्थी यांची वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आली. यावेळी पाणी हेच जीवन यावर मुलांनी उत्कृष्ट वक्तृत्व कथन केले. तसेच विद्यार्थ्याची चित्रकला, निबंध, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. यात गावातील महसूल, आरोग्य, ग्रामपंचायत या शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनीही सहभाग घेत मार्गदर्शन केले. गावातील महिलांनी रांगोळी स्पर्धेत सहभाग घेतला. यावेळी पाणलोट योद्धा म्हणून सर्वानुमते पाणलोट समिती सचिव प्रकाश गवस यांचे नाव घोषित करण्यात आले. या पाणलोट जनजागृती यात्रेत पाणलोट समिती सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे शिक्षक व विद्यार्थी पोस्टमास्तर, आरोग्यसेविका, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्यासह, बचत गट महिला, शेतकरी गट सदस्य आदी सहभागी झाले होते.