For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संवेदनशील मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांकडून जागृती

11:07 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
संवेदनशील मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांकडून जागृती
Advertisement

खानापूर : तालुक्यातील संवेदनशील मतदान केंद्रांवर निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदानाबाबत जानजागृती कार्यक्रम राबवण्यात आला. यात तोपिनकट्टी, गंदिगवाड, हिरेमुन्नोळी या ठिकाणी सहाय्यक निवडणूक अधिकारी बलराम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्वीप कमिटी तसेच पोलीस आणि इतर खात्यातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेऊन मतदान जागृती करून निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी बलराम चव्हाण म्हणाले की, मतदारांनी  प्रलोभनांना तसेच इतर कोणत्याही आमिषाला, दडपणाला न जुमानता लोकशाहीने दिलेल्या अधिकाराची अंमलबजावणी करावी, मुक्त आणि निष्पक्ष मतदानासाठी निवडणूक आयोग आणि सर्व अधिकारी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता मतदान करावे, कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी आमचे अधिकारी प्रयत्नशील आहेत. यावेळी स्वीप कमिटीच्या अध्यक्षा भाग्यश्री जहांगीरदार, तहसीलदार प्रकाश गायकवाड व उपनिरीक्षक एम. गिरीश यांनीही मतदारांना मार्गदर्शन केले. बैठकीत ग्रामविकास अधिकारी, सचिव, विविध विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.