For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोबाईलचा अतिरेक टाळण्यासाठी सायकलवरून जागृती

10:52 AM Feb 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोबाईलचा अतिरेक टाळण्यासाठी सायकलवरून जागृती
Advertisement

बेळगाव : लहान मुलांमध्ये मोबाईल वापरण्याच्या अतिरेक झाला असून मोबाईलपासून मुलांना दूर ठेवा, असा संदेश देत संकेश्वर येथील सायकलपटू रमेश पुजारी यांनी 1000 कि. मी. चा सायकल प्रवास केला. बेळगाव ते मंगळूर व मंगळूर ते बेळगाव असा प्रवास करत वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकाला मोबाईलचा अतिरेक टाळा, असा संदेश रमेश यांनी दिला. 26 जानेवारी रोजी टिळक चौक येथील राघवेंद्र मठापासून रमेश यांनी प्रवासाला सुरुवात केली. मंगळूर येथे पोहोचून तेथून पुन्हा ते बेळगावला आले. बेळगावमध्ये दाखल झाल्यानंतर नागरिकांतर्फे त्यांचा सन्मान केला. हॉटेल ओनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष विजय सालियान, सुनील पुजारी यांच्यासह इतर नागरिकांच्या हस्ते रमेश यांचा सत्कार करण्यात आला.

Advertisement

Advertisement
Tags :

.