डॉ.सोनाली सरनोबत यांना पुरस्कार
प्रतिनिधी/ बेळगाव
भारतीय जनसंपर्क परिषदतर्फे येथील होमिओपॅथिक डॉक्टर व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सोनाली सरनोबत यांना मंगळूर येथे झालेल्या संमेलनामध्ये चाणक्य राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक सेवा व उद्योजकीय नेतृत्व याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. डॉ. सरनोबत संचालित नियती फौंडेशन ही महिला आणि तरुणांसाठी कार्य करते. तसेच मिशन नो सुसाईड म्हणजेच आत्महत्या प्रतिबंध मोहीमही राबविते.
ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पीआरसीआयच्या राष्ट्रीय अध्यक्ष व गव्हर्निंग कौन्सिलच्या संचालक गीता शंकर व मिस ग्लोबल इंडियाच्या स्विजल फुर्ताडो यांच्या हस्ते डॉ. सरनोबत यांना पुरस्कार देण्यात आला. परिषदेने आयोजित केलेल्या ‘वुमन ईन डिजिटल वेल बिईंग अँड मॅनेजमेंट ऑफ डिजिटल हेल्थ’ या चर्चासत्रातही त्यांनी भाग घेतला. या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून यापुढील काळातही असेच काम करत राहू, अशी ग्वाही डॉ. सरनोबत यांनी दिली.