सेवामयी शिक्षक पुरस्कार देवयानी आजगावकर यांना प्रदान
आचरा | प्रतिनिधी
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण तर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारा शिक्षणतज्ज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार देवयानी त्रिंबक आजगावकर, यांना सन्मानपूर्वक आचरा हायस्कूल सभागृहात प्रदान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या वतीने सत्कारमूर्ती देवयानी आजगावकर यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व रोख पाच हजार रुपये असा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानी चंद्रशेखर हडप, सुरेश ठाकूर दत्तात्रय हिर्लेकर गुरुजी, सदानंद कांबळी, सुगंधा गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गौरी पटनाईक, कथामाला मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर, त्रिंबक आजगावकर, वजराट सरपंच अनन्या पुराणिक व साईशा पाटील, सुरेश गावकर, मोहन गावकर, नवनाथ भोळे, तातू कुबल, परशुराम गुरव, गुरुनाथ ताम्हणकर, विजय चौकेकर, चंद्रकांत माने, कल्पना मलये, रश्मी आंगणे, श्रुती गोगटे, रामचंद्र वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना सौ. देवयानी आजगावकर म्हणाल्या की शैक्षणिक कारकिर्दीमध्ये समाज व पालकांचे उत्तम सहकार्य लाभले आणि समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून विद्यार्थ्यांच्या विकासाचा विचार करून कार्य करत राहिले. त्यातूनच चांगले विद्यार्थी व चांगले काम घडल्याचे समाधान मिळाले. कथामालेने दिलेल्या पुरस्कारामुळे केलेल्या कामाची पोचपावती मिळाली.
यावेळी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी, बाबाजी भिसळे, लक्ष्मणराव आचरेकर, प्रकाश पेडणेकर, मनाली फाटक यांनीही आजगावकर मॅडमचा सत्कार केला. कोमसाप मालवणच्या वतीने अनिरुद्ध आचरेकर व सदस्य यांनी, कणकवली शिक्षकांच्या वतीने रश्मी आंगणे ,कल्पना मलये यांनी, हिर्लेकर गुरुजी, चंद्रहास हिर्लेकर यांनी आजगावकर मॅडम यांचा सत्कार केला. या पुरस्कार वितरण सोहळ्याला शिवराज सावंत, चंद्रशेखर धानजी, संजय परब, अमृता मांजरेकर , अनघा कदम, तेजल ताम्हणकर, सायली परब, विनोद कदम, भावना मुणगेकर, मधुरा माणगावकर, उज्वला धानजी कथामाला मालवणचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग कोचरेकर यांनी केले तर विजय चौकेकर यांनी आभार मानले.