महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आयुर्वेदमध्ये निरोगी जीवनाचा पुरस्कार

10:53 AM Oct 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आयुषचे डॉ. श्रीकांत सुनधेळी : शारीरिक उपचारांबरोबरच मनाच्या सक्षमतेवरही भर

Advertisement

बेळगाव : भारतीय पारंपरिक वैद्यकशास्त्रामध्ये आयुर्वेदाला विशेष महत्त्व आहे. साधारण 5 हजार वर्षांपूर्वी आयुर्वेद शास्त्राची उत्पत्ती झाली. आयु म्हणजे मानवी आयुष्य, वेद म्हणजे जाणणे. थोडक्यात, मानवी आयुष्याबद्दल जे हितकर आहे ते जाणणे. आयुर्वेद उपचारांपेक्षा निरोगी जीवनाचा पुरस्कार करते. मुख्य म्हणजे आयुर्वेदामध्ये शारीरिक उपचार तसेच मनाच्या सक्षमतेवरही भर दिला जातो. आयुर्वेदमध्ये शारीरिक परीक्षणाबरोबर नाडी, मूत्र, मल, डोळे, जीभ, कान व त्वचा यांच्या परीक्षणातून उपचार ठरविले जातात. आधुनिक वैद्यकशास्त्र प्रगत होत असले तरी आजही अनेकांचा कल आयुर्वेदाकडेच आहे. किमान अचूक निदान व्हावे यासाठी आयुर्वेदाची मदत घेतली जाते.

Advertisement

आयुर्वेदामध्ये पंचकर्म हा एक महत्त्वाचा उपचार आहे. शरीरातील दोष कमी करून ते अधिक गतिशील करण्यावर पंचकर्म भर देते. आयुर्वेद, योग, नॅचरोपॅथी, युनानी सिद्धा, सावा, रीगपा व होमिओपॅथिक या सर्वांचे मिळून आयुष फेडरेशन अस्तित्वात आले आहे. बेळगावमध्ये 1909 मध्ये आयुष्य विभाग सुरू झाला. 2012 मध्ये आयुष हॉस्पिटल सुरू झाले. बेळगाव जिल्ह्यात आयुषचे 34 दवाखाने असून तालुकास्तरावर 5 व जिल्हास्तरावर 1 हॉस्पिटल आहे. येथील व्हॅक्सिन डेपोतील आरोग्य खात्याच्या पुढे आयुष हॉस्पिटल असून विनामूल्य तपासणी व उपचार केले जातात. आयुर्वेद शास्त्रामध्ये एमडीची पदवी घेतलेले डॉक्टर येथे कार्यरत आहेत. दररोज अंदाजे 62 हून अधिक रुग्ण तपासणीसाठी येतात, अशी माहिती आयुषचे बेळगाव जिल्हा अधिकारी डॉ. श्रीकांत सुनधेळी यांनी दिली.

त्यांच्या मते आयुर्वेदिक वनस्पतींमध्ये अनेक औषधी गुणधर्म असून आपल्या स्वयंपाक घरातील औषधी गुणधर्माच्या आले, लसुण, सुंठ, हळद, आवळा, तिळाचे तेल यांचा वापर आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी करू शकतो. अजीर्ण, जुलाब, डोकेदुखी, आमवात या सर्वांवर आले किंवा सुंठ उपयोगी ठरते. अर्धा चमचा आल्याचा रस ताकासह घेतल्यास जुलाब कमी होतात. गुळवेलच्या काड्या किंवा पान व सुंठ एकत्र करून घेतल्यास संधिवात कमी होतो. तसेच ताप कमी होतो. लसुण, रक्तदाब व चरबी कमी करण्यासाठी तर हळद सर्दी, त्वचारोग व मधुमेह कमी करण्यासाठी उपयोगी असल्याचे त्यांनी सांगितले. मानसिक स्वास्थ्यासाठीसुद्धा आयुर्वेद उपयुक्त आहे. कामाचा ताण, राग, नैराश्य, दु:ख, खिन्नता, अनिद्रा, अतिआहार या सर्वांसाठी ब्राम्ही अतिशय उपयुक्त आहे, असेही ते म्हणाले. आयुर्वेद दिनानिमित्त आयुष फेडरेशनने शाळांमध्ये जाऊन या घरगुती उपचारांबद्दल जनजागृती केली व आयुर्वेदाचे महत्त्व पटवून दिले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article