महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

237 वेळा निवडणूक लढविणारा अवलिया

05:32 AM Nov 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वाजपेयी, नरसिंह राव यांच्याविरोधातही उमेदवारी

Advertisement

देशाच्या विविध निवडणुकांमध्ये 236 वेळा पराभव पत्करणारे तामिळनाडूचे के.के. पद्मराजन यांनी तेलंगणाच्या गजवेल मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघातून मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी स्वत:चा अर्ज भरला आहे. पद्मराजन हे ‘इलेक्शन किंग’ या नावाने प्रख्यात आहेत. तामिळनाडू, कर्नाटक, उत्तरप्रदेश आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये स्थानिक निवडणुकांपासून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांमध्ये त्यांचे हे 237 वे नामांकन आहे. सर्वसामान्य व्यावसायिक असलेले पद्मराजन यांनी सर्वप्रथम 1988 च्या विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूच्या मेट्टूर मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरला होता. तेव्हापासून त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, पी.व्ही. नरसिंह राव यांच्याविरोधातही निवडणूक लढविली आहे.

Advertisement

2011 मध्ये मिळाली सर्वात अधिक मते

2011 च्या विधानसभा निवडणुकीत मेट्टूर मतदारसंघात मला 6273 मते मिळाली होती. हा आकडा माझ्यासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. काही पंचायत निवडणुकांमध्ये मला एकच मत मिळाले होते, असे ते सांगतात. निवडणूक लढविण्याच्या ध्यासातून त्यांनी अनेक विक्रम नेंदविले आहेत. तसेच याकरता आतापर्यंत सुमारे 1 कोटी रुपये खर्च केले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी केरळच्या वायनाड मतदारसंघात राहुल गांधी यांच्या विरोधातही निवडणूक लढविली होती.

प्राप्तिकर विवरणपत्र सादर नाही

पद्मराजन यांनी किंवा त्यांच्या कुठल्याही कुटुंबीयाने आतापर्यंत एकदाही प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केलेले नाही. तसेच पद्मराजन यांनी 1 लाख 10 हजार रुपयांची चल संपत्ती घोषित केली असून यात एक मोपेड आणि एक लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न सामील आहे. 8 वीपर्यंत शिकलेले पद्मराजन हे आता अण्णामलाई मुक्त विद्यापीठातून इतिहासात एमए करत आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article