For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अविनाश साबळे 11 व्या स्थानी

07:00 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
अविनाश साबळे 11 व्या स्थानी
Advertisement

पॅरिस : 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पुरूषांच्या 3 हजार मीटर स्टिपलचेस प्रकारात भारताचा धावपटू अविनाश साबळे 11 व्या स्थानावर राहिला. या क्रीडा प्रकारातील झालेल्या अंतिम शर्यतीत 29 वर्षीय साबळेने 8 मिनिटे, 14.18 सेकंदाचा अवधी घेतला. अलिकडे झालेल्या पॅरिस डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत साबळेने या क्रीडा प्रकारात स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडताना 8 मिनिटे, 09.91 सेकंदाचा अवधी घेतला होता. पॅरिस ऑलिम्पिकसाठी अविनाश साबळेला प्रशिक्षणासाठी विदेशात पाठविण्यात आले होते. या क्रीडा प्रकारात मोरोक्कोच्या सोफिनी बाकेलीने सुवर्णपदक पुन्हा स्वत:कडे राखले. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळविले होते. बाकेलिने 8 मिनीटे, 06.47 सेकंदाचा अवधी घेतला. अमेरिकेच्या केनिट रुक्सने 8 मिनीटे, 06.41 सेकंदाचा अवधी घेत रौप्य पदक तर केनियाच्या अब्राहम किबीओतने 8 मिनिटे, 06.47 सेकंदाचा अवधी घेत कास्यपदक मिळविले. तिहेरी उडी क्रीडा प्रकारात भारताच्या प्रवीण चित्रावेल आणि अब्दुल्ला अबुबाकर यांना अंतिम फेरी गाठता आली नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.