कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एव्हेन्यू सुपरमार्टचा नफा 619 कोटी रुपयांवर

06:58 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मार्च तिमाहीचा निकाल जाहीर : 14 हजार कोटींचे उत्पन्न : 50 नवी स्टोअर्स झाली सुरु

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

डिमार्ट चालवणाऱ्या एव्हेन्यु सुपरमार्ट कंपनीने चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून कंपनीने 619 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. जानेवारी ते मार्च 2025 या कालावधीत कंपनीने 2 टक्के नफ्यात वाढ नोंदवली असून मागच्या वर्षी समान अवधीतला नफा 604 कोटी रुपये इतका होता.

उत्पन्न 16 टक्के वाढले

कंपनीने याचदरम्यान उत्पन्नात 16 टक्के तिमाहीत वाढ नोंदवली असून 14,462 कोटी रुपये इतके उत्पन्न प्राप्त केले आहे. मागच्या वर्षी समान अवधीत 12,393 कोटी रुपये उत्पन्नाखातर कंपनीने प्राप्त केले होते. तिमाही आधारावर नफा 21 टक्के कमी झाला आहे तर उत्पन्नही तिमाहीत आधारावर 7 टक्के घटलेले आहे. वर्षाच्या आधारावर मात्र कंपनीच्या एकंदर खर्चात वाढ होत तो 13,713 कोटी रुपयांवर पोहचला आहे. जो मागच्या खेपेला 11,641 कोटी इतका होता. मागच्या तिमाहीत खर्च 5 टक्के कमी होत 14,549 कोटींवर होता.  राधाकिशन दमानी यांच्या मालकीच्या कंपनीने आर्थिक वर्ष 2025 मध्ये उत्तम प्रदर्शन केले. वर्षाचा निव्वळ नफा 8.6 टक्के वाढत 2927 कोटी रुपये इतका राहिला. आर्थिक वर्ष 2024 मध्ये हा नफा 2694 कोटी रुपये होता.

28 नवी स्टोअर्स सुरु

चौथ्या तिमाहीत कंपनीने 28 नवी स्टोअर्स उघडली आहेत. तर संपूर्ण वर्षात 50 नवी स्टोअर्स एकंदर सुरु केली आहेत. एफएमसीजी क्षेत्रात वाढती स्पर्धा यामुळे मार्जीनवर दबाव दिसून आला. कुशल कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सुरुवातीला वेतनात वाढ करण्यात आली. सेवा उत्तम करण्यासोबत वस्तुंची गतीने उपलब्धता करण्याची सोय व नियमीत गुंतवणूक याच्या जोरावर कंपनीने चांगली वाटचाल केली आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article