एव्हेन्यू सुपरमार्टचे समभाग घसरले, तिमाही निकाल घोषित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डि मार्ट सुपर मार्केट चालविणारी कंपनी एव्हेन्यू सुपरमार्टचा सप्टेंबर तिमाहीचा निकाल जाहीर झाला असून त्याचे नकारात्मक परिणाम सोमवारी समभागावर पहायला मिळाले. समभाग इंट्रा डे दरम्यान 9 टक्के घसरणीत होते.
सप्टेंबर तिमाहीअखेर कंपनीच्या निव्वळ नफ्यात वर्षाच्या आधारावर 8 टक्के वाढ झाली आहे. यायोगे नफा 710 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या आधीच्या वर्षी समान अवधीत 658 कोटी रुपयांचा नफा कंपनीने प्राप्त केला होता. एप्रिल-जूनच्या तिमाहीच्या तुलनेमध्ये कंपनीच्या नफ्यामध्ये 13 टक्के घसरण पहायला मिळाली. एप्रिल-जून तिमाहीत 812 कोटी रुपयांचा नफा कंपनीने प्राप्त केला होता. कंपनीने सप्टेंबर तिमाहीत 14050 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. जो मागच्या तुलनेत 14 टक्के अधिक आहे. मागच्या वर्षी याच तिमाहीत 12307 कोटी रुपये महसूल प्राप्त करण्यात आला होता.
समभागाची कामगिरी
जे. पी. मॉर्गन या संस्थेने कंपनीच्या समभागाबाबत भविष्यात नकारात्मक कल नोंदवला आहे. तिमाही निकालानंतर कंपनीचे समभाग 9 टक्के इतके घसरत एनएसईवर 4139 रुपयांवर घसरले होते. गेल्या महिन्याभरामध्ये समभाग 12 टक्के घसरला असून 6 महिन्यात 2.49 टक्के घसरणीत आहे.