महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कुडाळात 28 ते 31 डिसेंबर रोजी ऑटो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवल

03:20 PM Dec 05, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ कुडाळचे आयोजन

Advertisement

कुडाळ / प्रतिनिधी
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गचा ऑटो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवल यावर्षी 28 ते 31 डिसेंबर या कालावधीत कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. लायन्स क्लबच्या महोत्सवाचे यावर्षीचे 23 वे वर्ष आहे. विविध मनोरंजन कार्यक्रमाबरोबरच दिग्गज कलावंताची उपस्थिती या महोत्सवात असणार आहे अशी  माहिती पत्रकार परिषदेत लायन्स क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर व लायन्स सेवा संकुल अध्यक्ष ॲड अमोल सामंत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर विविध कार्यक्रमांचे आयोजन डिसेंबर महिन्यात केले जाते. यावर्षी लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गच्या वतीने हा ऑटो इंडस्ट्रीयल कम फूड फेस्टिवल 28 ते 31 डिसेंबर रोजी सलग चार दिवस सायंकाळी ६ ते रात्रीपर्यंत होणार आहे. आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी लायन्स क्लबचे ज्येष्ठ पदाधिकारी ॲड अजित भणगे,  आनंद बांदिवडेकर, सीए सागर तेली, शोभा माने, गणेश म्हाडदळकर, ॲड मिहीर भणगे ,ॲड शेखर वैद्य ,डॉ अमोघ चुबे ,जीवन बांदेकर ,मंजुनाथ फडके आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना लायन्स सेवा संकुल अध्यक्ष ॲड. अमोल सामंत म्हणाले 1998 मध्ये गोवा धर्तीवर फूड फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले होते . आज आमच्या लायन्स क्लब ऑफ सिंधुदुर्गच्या फेस्टिवलचे 23 वे वर्ष असून यावर्षी ऑटो .इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवल असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. लायन्स क्लब हा नेहमी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतानाच नवीन वर्षाचे स्वागत आणि जुन्या वर्षाला निरोप देण्याच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव  सलग चार दिवस विविध करमणूकीच्या कार्यक्रमाने होणार आहे. महोत्सवात सिंधुदुर्गसह पुणे ,सांगली, सातारा ,कोल्हापूर, मुंबई या भागातून विविध गाड्या, इंडस्ट्रियल, विविध खाद्य संस्कृतीचे सुमारे नव्वद स्टॉल सहभागी होतील. 50 ते 60 हजार लोक या महोत्सवाला भेट देतील. सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून  एकाच व्यासपीठावर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना आणण्याचा आमचा प्रयत्न  असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान या  फूड फेस्टिवल मध्ये सर्व प्रकारच्या गाड्या व या गाड्यांसाठी फायनान्स करण्यासाठी बँका कार्यरत असतील. 28 ते 31 डिसेंबर या कालावधीत खाद्य संस्कृतीसह मनोरंजन होण्यासाठी विविध अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 31 डिसेंबरला या फेस्टिवलला नामांकित दिग्गज असे कलाकार येणार असल्याचे सांगितले. लायन्स क्लब अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर यांनी 23 वा हा फूड फेस्टिवल होत असून या फेस्टिवल मध्ये शेतकऱ्यांसाठी सुद्धा स्टॉल असणार आहेत. सीए सागर तेली यांनी लायन्स क्लब ही आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य उपक्रम राबवले जातात. पर्यावरण विषयक उपक्रम या संस्थेने राबवलेले आहेत . अशा सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्थेने गेली 23 वर्षे फूड फेस्टिवलच्या माध्यमातून रसिकांचे विविध माध्यमातून मनोरंजन केले आहे. सर्वाना आनंद देण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा आपला महोत्सव यावर्षी प्रथमच सलग चार दिवस होत असल्याचे स्पष्ट केले. यासाठी गेली 22 वर्षे फेस्टिवल यशस्वीततेसाठी जिल्हावासियांचे सहकार्य लाभत असल्याचे सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news sindhudurg # news update # konkan update # marathi news # kudal #
Next Article