For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुपर-8 चे संघ ठरले, 20 पैकी 11 संघांचा पत्ता कट

06:37 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुपर 8 चे संघ ठरले   20 पैकी 11 संघांचा पत्ता कट
Advertisement

19 जूनपासून रंगणार सामने : टीम इंडियाची लढत अफगाणशी : बांगलादेश-नेदरलँड्समध्ये एका जागेसाठी काँटे की टक्कर

Advertisement

वृत्तसंस्था/ सेंट ल्युसिया, वेस्ट इंडिज

आयसीसी टी 20 विश्वचषक स्पर्धेत सुपर-8 मध्ये कोणते संघ दाखल होणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये तब्बल 20 संघांनी सहभाग घेतला होता, यापैकी 11 संघांचा पत्ता कट झाला आहे. आठ संघ सुपर-8 साठी पात्र ठरणार असून यातील सात संघांनी पात्रता मिळवली आहे. उर्वरित एका जागेसाठी बांगलादेश व नेदरलँड्स यांच्यात चुरस असणार आहे. 19 जूनपासून सुपर-8 मधील सामन्यांना प्रारंभ होणार आहे. सुपर-8 मध्ये पोहोचलेल्या संघांना प्रत्येकी तीन सामने खेळावे लागणार आहेत. यानंतर उपांत्य व अंतिम फेरीचे सामने होतील.

Advertisement

टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 साठी दोन गट तयार करण्यात आले आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान एकाच गटात आहेत. आता यामध्ये चौथा संघ बांगलादेश किंवा नेदरलँडला प्रवेश मिळेल. दुसऱ्या गटात दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अमेरिका आणि इंग्लंड यांचा समावेश आहे. भारताबरोबरच अमेरिकेनेही अ गटातून पात्रता मिळवली आहे. आपला पहिलावाहिला वर्ल्डकप खेळणाऱ्या अमेरिकेला लॉटरी लागली असून सुपर 8 सोबत त्यांनी 2026 वर्ल्डकपसाठी देखील पात्रता मिळवली आहे. याशिवाय, अफगाणिस्तानने देखील दमदार कामगिरी करत प्रथमच सुपर 8 फेरी गाठली आहे.

टीम इंडियाची पहिली लढत अफगाणशी

सुपर 8 मधील भारताची पहिला सामना 20 जूनला होणार आहे. भारताची ही मॅच क गटातील पहिल्या स्थानावर असलेल्या संघासोबत होईल. सध्या क गटात पहिल्या स्थानावर अफगाणिस्तान आहे. उभय संघातील हा सामना झाल्यास ती बार्बाडोसमध्ये होईल. यानंतर भारताची दुसरी लढत बांगलादेश-नेदरलँड्स यांच्यातील विजेत्यांशी 22 जून रोजी होईल. तर टीम इंडियाचा तिसरा सामना 24 जूनला होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही लढत सेंट ल्यूसियामध्ये होईल.

सुपर-8 साठी पात्र ठरलेले संघ - भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफगाणिस्तन, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका. बांगलादेश व नेदरलँड्स यांच्यातील एक विजेता सुपर 8 साठी पात्र ठरेल.

वर्ल्डकपबाहेर गेलेले संघ - पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, नेपाळ, ओमान, नामिबिया, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, आयर्लंड व युगांडा.

टी 20 विश्वचषक सुपर 8 फेरीचे वेळापत्रक

गट 1

20 जून - अफगाणिस्तान वि भारत, ब्रिजटाउन, बार्बाडोस, रात्री 8 वा.

21 जून - ऑस्ट्रेलिया वि डी 2, नॉर्थ साऊंड, अँटिग्वा, सकाळी 6 वा.

22 जून - भारत वि डी 2, नॉर्थ साऊंड, अँटिग्वा, रात्री 8 वा.

23 जून - अफगाण वि ऑस्ट्रेलिया, अर्नोस व्हॅले, सेंट व्हिन्सेंट, सकाळी 6 वा.

24 जून - ऑस्ट्रेलिया वि भारत, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया, रात्री 8 वा.

25 जून - अफगाण  वि डी 2, अर्नोस व्हॅले, सेंट व्हिन्सेंट. सकाळी 6 वा.

गट 2

19 जून - अमेरिका वि दक्षिण आफ्रिका, नॉर्थ साऊंड, अँटिग्वा, रात्री 8 वा.

20 जून - इंग्लंड वि वेस्ट इंडिज, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया, सकाळी 6 वा.

21 जून - इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया, रात्री 8 वा

22 जून - अमेरिका वि वेस्ट इंडिज, ब्रिजटाऊन, बार्बाडोस, सकाळी 6 वा.

23 जून - अमेरिका वि इंग्लंड, ब्रिजटाऊन, बार्बाडोस, रात्री 8 वा

24 जून - वेस्ट इंडिज वि द. आफ्रिका, नॉर्थ साउंड, अँटिग्वा, सकाळी 6 वा.

Advertisement
Tags :

.