For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियाचा टी-20 संघ जाहीर

06:39 AM Oct 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियाचा टी 20 संघ जाहीर
Advertisement

वृत्तसंस्था/मेलबोर्न

Advertisement

पुढील महिन्यात यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाक यांच्यात होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 13 सदस्यांचा संघ सोमवारी जाहीर केला. या मालिकेसाठी कसोटीत खेळणाऱ्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. मात्र या मालिकेकरिता ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधाराची घोषणा अद्याप झालेली नाही.

भारतीय संघ नोव्हेंबर अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. ही मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरू होईल. या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. पाक विरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आता नव्या कर्णधारचा शोध घेत आहेत. वेगवान गोलंदाज झेवियर बार्टलेट, नाथन् इलीस आणि स्पेन्सर जॉन्सन यांचा संघात समावेश झाला आहे. ग्लेन मॅक्सवेल, स्टोईनस, झंपा आणि इंग्लीस यांना संघात स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियन वनडे संघाचा कर्णधार मिचेल मार्श तसेच कसोटी संघाचा कर्णधार पॅटकमिन्स हे भारताविरुद्ध पर्थ येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी सरावाकरिता दाखल होत असल्याने ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे ऑस्ट्रेलियन निवड समितीला पहिल्यांदाज पाक विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी नव्या कर्णधाराची नियुक्ती करावी लागणार आहे. या मालिकेसाठी निवडण्यात आलेला ऑस्ट्रेलियन संघ हा संमिश्र असून यामध्ये बऱ्याच नवोदितांना अनुभवासाठी संधी देण्यात आली असल्याची माहिती निवड सदस्य प्रमुख जॉर्ज बेली यांनी वृत्तसंस्थेशी बोतलाना दिली.

Advertisement

ऑस्ट्रेलियन टी-20 संघ-सिन अॅबॉट, झेवियर बार्टलेट, कुपर कोनोली, टीम डेव्हिड, नाथन् इलिस, जॅक फ्रेजर-मॅकगर्क, अॅरॉन हार्डी, जोश इंग्लीस, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यु शॉर्ट, स्टोईनीस आणि झंपा

पहिला टी-20 सामना 14 नोव्हेंबर ब्रिसबेन, दुसरा सामना 16 नोव्हेंबर-सिडनी आणि तिसरा सामना 18 नोव्हेंबरला होबार्ट.

Advertisement
Tags :

.