For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियाचा भारतावर मालिका विजय

06:52 AM Jan 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियाचा भारतावर मालिका विजय
Advertisement

तिसऱ्या सामन्यात 7 गड्यांनी मात, अॅनाबेल सदरलँड सामनावीर, अॅलिसा हिली मालिकावीर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी मुंबई

भारताच्या दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. मंगळवारी येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 चेंडू बाकी ठेऊन 7 गड्यांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या सदरलँडला ‘सामनावीर’ तर कर्णधार अॅलिसा हिलीला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली. भारताने 20 षटकात 8 बाद 147 धावा जमविल्या. शफाली वर्माने 17 चेंडूत 6 चौकारांसह 26 धावा जमविताना स्मृती मानधनासमवेत पहिल्या गड्यासाठी 20 चेंडूत 39 धावांची भागिदारी केली. मानधनाने 28 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 29 धावा जमविल्या. रॉड्रीग्ज आणि कर्णधार हरमनप्रित कौर हे दोन फलंदाज लवकर बाद झाले. रिचा घोषने 28 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 34, दीप्ती शर्माने 2 चौकारांसह 14, अमनज्योत कौरने 14 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 17 तर पूजा वस्त्रकारने 2 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 7 धावा जमविल्या. भारताच्या डावात 5 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे सदरलँड आणि वेरहॅम यांनी प्रत्येकी 2 तर स्कूट आणि गार्डनर यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डावात अॅलिसा हिलीने कप्तानी खेळी करताना 38 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 55 धावा जमविल्या. बेथ मुनीने 45 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 52 धावा केल्या. मॅकग्राने 15 चेंडूत 4 चौकारांसह 20 धावा जमविल्या. पेरीला आपले खाते उघडता आले नाही. लिचफिल्डने 13 चेंडूत 3 चौकारांसह 17 धावा जमविल्या. हिली आणि मुनी यांनी सलामीच्या गड्यासाठी 60 चेंडूत 85 धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या डावात 1 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियाने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात 54 धावा झोडपल्या. ऑस्ट्रेलियाचे पहिले अर्धशतक 34 चेंडूत तर शतक 73 चेंडूत नोंदविले गेले. मुनीने आपले अर्धशतक 45 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने तर हिलीने आपले अर्धशतक 34 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने झळकवले. भारतातर्फे पूजा वस्त्रकरने 2 तर दीप्ती शर्माने 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियन महिला संघाने भारताच्या दौऱ्यामध्ये एकमेव कसोटी सामना गमाविला. त्यानंतर त्यांनी वनडे आणि टी-20 मालिका जिंकून या दौऱ्याची यशस्वी सांगता केली.

संक्षिप्त धावफलक : भारत 20 षटकात 6 बाद 147 (शफाली वर्मा 26, स्मृती मानधना 29, रिचा घोष 34, दीप्ती शर्मा 14, अमनजीत कौर नाबाद 17, वस्त्रकर नाबाद 7, अवांतर 15, सदरलँड 2-12, वेरहॅम 2-24, स्कूट 1-36, गार्डनर 1-40), ऑस्ट्रेलिया 18.4 षटकात 3 बाद 149 (हिली 55, बेथ मुनी नाबाद 52, मॅकग्रा 20, पेरी 0, लिचफिल्ड नाबाद 17, अवांतर 5, पूजा वस्त्रकार 2-26, दीप्ती शर्मा 1-32).

Advertisement
Tags :

.