ऑस्ट्रेलियाचा 654 धावांचा डोंगर
उस्मान ख्वाजाचे पहिले द्विशतक, इंग्लीसचा पदार्पणातच जलद शतक नोंदवण्याचा विक्रम
वृत्तसंस्था/गॅले
लंकेच्या दौऱ्यावर आलेल्या बलाढ्या ऑस्ट्रेलियन संघाने येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात दमदार फलंदाजी करताना यजमान लंकेच्या गोलंदाजीची धुलाई केली. उस्मान ख्वाजाचे दमदार द्विशतक (232) तसेच कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि जोस इंग्लीस यांच्या शानदार शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने गुरुवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी आपला पहिला डाव 6 बाद 654 धावांवर घोषित केला. त्यानंतर लंकेने पहिल्या डावात 3 बाद 44 धावा जमविल्या होत्या. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने 2 बाद 330 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. 147 धावांवर नाबाद राहिलेल्या ख्वाजाने आपले द्विशतक पूर्ण केले. उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने 3 बाद 475 धावा जमविल्या होत्या. खेळाच्या पहिल्या सत्रात कर्णधार स्मिथ पायचित झाला. त्याने 251 चेंडूत 2 षटकार आणि 12 चौकारांसह 141 धावा जमविल्या.
ख्वाजाचे पहिले द्विशतक
38 वर्षीय उस्मान ख्वाजाने तब्बल साडेसात तास खेळपट्टीवर राहून कसोटीतील आपले पहिले द्विशतक झळकविले. ख्वाजाने यापूर्वी म्हणजे 2023 साली सिडनीत द. आफ्रिकेविरुद्ध नाबाद 195 धावा झळकविल्या होत्या.
इंग्लिसचे वेगवान शतक
इंग्लीसने 90 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारासह शतक पूर्ण केले. पदार्पणातच वेगवान शतक ठोकण्याचा ऑस्ट्रेलियन विक्रम त्याने नोंदवला. त्याचे हे दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान शतक आहे. भारताच्या शिखर धवनने पदार्पणातच 87 चेंडूत शतक नोंदवण्याचा जागतिक विक्रम नोंदवला आहे. चहापानावेळी जयसुर्याने इंग्लीसला झेलबाद केले. त्याने 94 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 102 धावा जमविल्या. लंकेच्या फिरकी गोलंदाजीसमोर ख्वाजाने मनसोक्त फटकेबाजी केली. त्याने एकेरी धाव घेत आपले द्विशतक पूर्ण केले. ख्वाजाला 90 धावांवर असताना लंकेच्या कुशल मेंडीसने जीवदान केले. तर 74 धावांवर असताना तो यष्टीरक्षककरवी झेलबाद झाला होता. पण लंकेने रिव्ह्यू न घेतल्याने त्याला एक जीवदानच मिळाले. ऑस्ट्रेलियातर्फे कसोटीत तिसऱ्या गड्यासाठी ख्वाजा आणि कर्णधार स्मिथ यांनी विक्रमी 266 धावांची भागिदारी केली. यापूर्वी म्हणजे 2004 साली कॅन्डीमध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गिलख्रिस्ट आणि मार्टिन यांनी तिसऱ्या गड्यासाठी 200 धावांची भागिदारी केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा स्टिव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा चौथा तर असा पराक्रम करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतील तो 15 वा फलंदाज आहे.
इंग्लिसचे ऑस्ट्रेलियातर्फे पदार्पणात वेगवान शतक
उपाहारानंतर ख्वाजा आणि इंग्लीस जोडीने चौथ्या गड्यासाठी 146 धावांची भागिदारी केली. दरम्यान जयसुर्याने ख्वॉजाला मेंडीसकरवी झेलबाद केले. त्याने 352 चेंडूत 1 षटकार आणि 16 चौकारांसह 232 धावा जमविल्या. इंग्लीसने 90 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारासह शतक पूर्ण केले. पदार्पणातच वेगवान शतक ठोकण्याचा ऑस्ट्रेलियन विक्रम त्याने नोंदवला. त्याचे हे दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान शतक आहे. भारताच्या शिखर धवनने पदार्पणातच 87 चेंडूत शतक नोंदवण्याचा जागतिक विक्रम नोंदवला आहे. चहापानावेळी ऑस्ट्रेलियाने 143 षटकात 5 बाद 600 धावा जमविल्या होत्या. जयसुर्याने इंग्लीसला झेलबाद केले. त्याने 94 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 102 धावा जमविल्या.
खेळाच्या शेवटच्या सत्राला प्रारंभ झाला आणि वेबस्टरने 50 चेंडूत 1 चौकारांसह 23 धावा जमविताना कॅरेसमवेत सहाव्या गड्यासाठी 59 धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाने 650 धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर त्यांनी पहिल्या डावाची घोषणा केली. 154 षटकात ऑस्ट्रेलियाने 6 बाद 654 धावा जमविल्या. कॅरे 46 तर स्टार्क 19 धावांवर नाबाद राहिले. लंकेतर्फे प्रभात जयसुर्या आणि व्हॅन्डेरसे यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
लंकेच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. दुसऱ्या षटकातच त्यांचा सलामीचा फलंदाज ओशादा फर्नांडो कुहेनमनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 7 धावा जमविल्या. त्यानंतर स्टार्कने डी. करुणारत्नेला 7 धावांवर झेलबाद केले. लियॉनने अॅन्जेलो मॅथ्युजला 7 धावांवर हेडकरवी झेलबाद केले. लंकेने दिवसअखेर 15 षटकात 3 बाद 44 धावा जमविल्या. चंडीमल 9 तर कमिंदु मेंडीस 13 धावांवर खेळत आहे. या कसोटीवर ऑस्ट्रेलियाने आपले वर्चस्व पूर्णपणे राखले असून आता हा संघ मोठा विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. लंकेचा संघ 610 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 7 गडी खेळावयाचे आहेत. खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये किरकोळ पावसाच्या सरी कोसळल्याने पंचांनी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया प. डाव 154 षटकात 6 बाद 654 डाव घोषित (उस्मान ख्वाजा 232, हेड 57, लाबुशेन 20, स्टिव्ह स्मिथ 143, इंग्लीस 102, कॅरे नाबाद 46, वेबस्टर 23, स्टार्क नाबाद 19, अवांतर 14, जयसुर्या 3-193, व्हॅन्डेरसे 3-182), लंका प. डाव 15 षटकात 3 बाद 44 (ओशादा फर्नांडो 7, करुणारत्ने 7, मॅथ्युज 7, चंडीमल खेळत आहे 9, कमिंदु मेंडीस खेळत आहे 13, स्टार्क, कुहेनमन, लियॉन प्रत्येकी 1 बळी)