For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियन ओपन आजपासून

06:46 AM Nov 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियन ओपन आजपासून
Advertisement

सात्विक-चिरागवर जास्त आशा

Advertisement

वृत्तसंस्था/ सिडनी

भारताचे एकेरीतील तारे अजूनही लय शोधत असताना आज मंगळवारपासून येथे सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष सात्विकसाईराज रान्कीरे•ाr आणि चिराग शेट्टी यांच्यावर असेल. कारण ही अव्वल मानांकित पुऊष दुहेरी जोडी हंगामातील पहिले जेतेपद पटकावण्याच्या दृष्टीने लक्ष केंद्रीत करेल

Advertisement

भारतीय बॅडमिंटनसाठी हा मोसम वेगळ्या अडचणी उभा करणारा राहिलेला असला, तरी आशियाई क्रीडा स्पर्धेतील या विजेत्यांनी चमकदार कामगिरी केलेली आहे. त्यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील दुसरे कांस्यपदक आणि हाँगकाँग सुपर 500 आणि चायना मास्टर्स सुपर 750 मध्ये सलग उपविजेतेपदे पटकावली. जागतिक क्रमवारीत 18 आठवडे पहिल्या क्रमांकावर राहिलेली ही जोडी मे महिन्यात 27 व्या क्रमांकावर घसरली होती. पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचताना त्यांनी भरपूर संघर्ष केलेला आहे.

वर्ल्ड टूर फायनल्सपूर्वी ते आणखी एक मजबूत कामगिरी करण्यास उत्सुक असतील. राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतील ही विजेती जोडी चिनी तैपेईच्या चांग को-ची आणि पो ली-वेईविऊद्ध सलामीची लढत देईल. दुखापती आणि गमावलेला फॉर्म यांनी ग्रासलेले, पण अधूनमधून आपली तेजस्वी चमक दाखविलेले भारताचे आघाडीचे एकेरी तारे वर्षातील बराच काळ त्यांच्यापासून दूर राहिलेली सातत्यपूर्ण लय मिळवण्याची आशा बाळगतील. लक्ष्य सेन आणि एच. एस प्रणॉय यांचा त्यात समावेश होतो.

पॅरिस ऑलिंपिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिल्यानंतर खराब कामगिरी केलेल्या लक्ष्यने हाँगकाँग ओपनमध्ये अंतिम फेरीत प्रवेश करत आपला फॉर्म पुन्हा मिळविला होता. अल्मोराच्या या 24 वर्षीय खेळाडूने गेल्या आठवड्यात जपानमध्येही चमक दाखविली आणि तो उपांत्य फेरीत पराभूत झाला. येथे सातवा मानांकित असलेला लक्ष्य चिनी तैपेईच्या सु ली यांगविऊद्ध सलामीची लढत लढताना अलीकडची गती कायम ठेवण्याची आशा करेल.

2023 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता प्रणॉय गेल्या वर्षी येथे उपविजेता राहिला होता. त्यामुळे या स्पर्धेच्या गोड आठवणी त्याच्याकडे आहेत. प्रणॉय कॅनडाच्या ब्रायन यांगशी पहिल्या लढतीत लढेल. दुसरीकडे, या वर्षीच्या मलेशिया मास्टर्समध्ये उपविजेता राहिललेला अनुभवी किदाम्बी श्रीकांत पाचव्या मानांकित लिन चुन-यीशी खेळताना पूर्ण लय मिळवण्याचा प्रयत्न करेल, तर यूएस ओपन चॅम्पियन आयुष शेट्टी मलेशियाच्या जस्टिन होहचा सामना करेल. इतरांमध्ये किरण जॉर्ज जपान मास्टर्समध्ये उपविजेत्या राहिलेल्या सहाव्या मानांकित केंटा निशिमोटाचा सामना करेल, तर थऊन मन्नेपल्ली डेन्मार्कच्या मॅग्नस जोहानेसेनविऊद्धच्या सलामीला लढतीत यश मिळवण्याचा प्रयत्न करेल. महिला एकेरीत आकर्शी कश्यप ही एकमेव भारतीय आहे. परंतु तिला अव्वल मानांकित आणि ऑलिंपिक विजेत्या अन से यंगचे आव्हान सलामीलाच पेलावे लागेल.

Advertisement
Tags :

.