कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलची निवृत्ती

06:16 AM Jun 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वनडे क्रिकेटला केला अलविदा : दक्षिण आफ्रिकेच्या अनुभवी हेन्रिक क्लासेनचाही कसोटीला अलविदा

Advertisement

वृत्तसंस्था/ .सिडनी, केपटाऊन

Advertisement

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. मॅक्सवेलची एकदिवसीय कारकीर्द 13 वर्षांची राहिली. मॅक्सवेलने या 13 वर्षांच्या वनडेत कारकीर्दीत अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. वनडे क्रिकेटला जरी अलविदा केला असला तरी टी 20 क्रिकेटमध्ये मात्र त्याने खेळत राहणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय, मॅक्सवेलपाठोपाठ काही तासांनी दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज हेन्रिक क्लासेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. क्लासेनने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

2012 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा  मॅक्सवेलच्या नावे दोन वनडे वर्ल्डकप आहेत. त्याने 149 एकदिवसीय सामन्यांमध्ये जवळपास 4 हजार धावा केल्या आहेत, तर गोलंदाजीत त्याच्या नावे 79 विकेट्स आहेत. मॅक्सवेल हा उत्कृष्ट ऑफस्पिनर आहे, तर फलंदाजीत एकट्याच्या बळावर त्याने संघाला विजय मिळवून दिला आहे. तो ऑस्ट्रेलियासाठी एक मोठा मॅचविनर खेळाडू आहे.

मॅक्सवेलने निवृत्तीबाबत चीफ सिलेक्टर जॉर्ज बेली यांना आधीच कल्पना दिली होती. फेब्रुवारी-मार्च महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान आगामी वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये खेळू शकत नाही, असे त्याने सांगितले होते. मला वाटतं की आता माझ्या जागी इतर खेळाडूंना संधी देण्यासाठी योजना आखण्याची वेळ आली आहे. त्यांनी त्यावर काम करायला हवे. तसेच 2027 च्या वर्ल्ड कपमध्ये त्या जागेसाठी दावा करण्याचा प्रयत्न खेळाडूंनी करायला हवा. मला आशा आहे त्या जागेसाठी प्रबळ खेळाडू मिळेल जो यशस्वीपणे भूमिका बजावेल, असेही मॅक्सवेलने म्हटले आहे.

दक्षिण आफ्रिकेलाही मोठा धक्का, स्टार खेळाडूचा क्रिकेटला अलविदा

दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्लासेनने 33 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी त्याने 8 जानेवारी 2024 ला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याने टी 20 वर्ल्डकप आफ्रिकेला अंतिम फेरीत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. यासह वनडे क्रिकेटमध्येही त्याचा बोलबाला पाहायला मिळाला होता. आता सोमवारी (2 जून) त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

क्लासेनने जानेवारी 2024 मध्ये कसोटी क्रिकेटला रामराम केला होता. अवघ्या 4 कसोटी सामने खेळताना त्याने 104 धावा केल्या. तर आता क्लासेनने वनडे आणि टी 20 क्रिकेटलाही बायबाय केला आहे. क्लासेनने 60 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2 हजार 141 धावा केल्या. या दरम्यान 4 शतकं आणि 11 अर्धशतकं झळाकवली. तसेच 58 टी 20 सामन्यांमध्ये 1 हजार धावा केल्या.

प्रतिक्रिया

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणं हा माझ्यासाठी खूप दु:खद दिवस आहे. भविष्यात माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी काय चांगलं आहे, हे ठरवण्यासाठी मला बराच वेळ लागला. हा निर्णय घेणं खूप कठीण होतं, पण हा निर्णय घेणं गरजेचं होतं.

हेनरिक क्लासेन, दक्षिण आफ्रिकन फलंदाज

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article